शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, महाबळेश्वरला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:06 IST

सातारा : सकाळपासून भरून आलेल्या ढगांनी दुपारच्या सुमारास महाबळेश्वरला तर सायंकाळी सातारा शहराला झोडपले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ...

सातारा : सकाळपासून भरून आलेल्या ढगांनी दुपारच्या सुमारास महाबळेश्वरला तर सायंकाळी सातारा शहराला झोडपले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. साताऱ्यात तर ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता.सातारा शहराबरोबर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. मात्र, पाऊस पडेल असे वाटत असतानाही हुलकावणी मिळत होती. रविवारी तर सकाळपासूनच सातारा शहर व परिसरात आभाळ भरून आले होते. त्यामुळे पाऊस पडणार, असे चित्र होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आभाळ भरून आले. त्यामुळे अंधार पडू लागला आणि त्यानंतर बघता-बघता पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. मात्र, पावणेपाचनंतरच पावसाने खरा जोर धरला. सुमारे १५ मिनिटे पाऊस पडला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पावसाने सातारकरांना चांगलेच झोडपले. अनपेक्षितपणे आलेल्या या पावसाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. तर रस्त्याच्या बाजूला विक्री करणाºया छोट्या व्यावसायिकांना सर्व साहित्य गोळा करताना अडचणी निर्माण झाल्या. या पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.