शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

फाशीचा वडची स्वच्छता करून ‘सातारा क्रांती दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयाच्या इतिहासात ८ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. १८५७ च्या बंडात सहभाग असणारे साताºयाचे सतरा नरवीर आजच्या दिवशीच शहीद झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गेंडामाळ येथे फाशीचा वड उभारला आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी कला, वाणिज्य महाविद्यालय व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या वतीने फाशीचा ...

ठळक मुद्दे ‘जिज्ञासा ग्रुप’चा उपक्रम ; कला, वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागविल्या क्रांतिकारकांच्या आठवणी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयाच्या इतिहासात ८ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. १८५७ च्या बंडात सहभाग असणारे साताºयाचे सतरा नरवीर आजच्या दिवशीच शहीद झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गेंडामाळ येथे फाशीचा वड उभारला आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी कला, वाणिज्य महाविद्यालय व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या वतीने फाशीचा वड येथे शुक्रवारी अभिवादन केले.

क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारा जगभर ओळखला जातो. देशावरील प्रत्येक संकटावेळी सातारा जिल्हा धावून आला. १८५७ चा लढा स्वातंत्रसंग्रामातील महत्त्वाचा मानला जातो. यामध्येही साताºयातील सुपुत्र सहभागी झाले होते.या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना १८५७ च्या बंडातील सातारकरांचे योगदान, रगोंबापूजी गुप्तेंनी स्वामी निष्ठेपाई सातारा ते इंग्लंडपर्यंत केलेला चित्तथरारक प्रवास व इंग्लंडमधील त्यांचे कार्य याबद्दल जिज्ञासा इतिहास संशोधन ग्रुपचे नीलेश पंडित यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी जिज्ञासा संस्थेचे पदाधिकारी तसेच कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. बी. सातपुते, प्रा. डॉ. भरत जाधव, प्रा. डॉ. संदीप पाटील, प्रा. संदीप पाटील, प्रा. प्रकाश कांबळे, प्रा. युवराज जाधव, सागर गायकवाड, प्रा. गौतम काटकर उपस्थित होते.प्रशासनाचे दुर्लक्षसातारा क्रांती दिनी दरवर्षी जिज्ञासा इतिहास संशोधन क्रांती दिनी विविध उपक्रमांनी अभिवादन केले जाते. परंतु, प्रशासनाचे दरवर्षीच दुर्लक्ष होत आहे. कोणताही प्रतिनिधी तेथे येऊन अभिवादन करत नाही, अशी खंत इतिहास संशोधकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सातारा येथील फाशीचा वड येथे शुक्रवारी जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था व कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.