शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

सातारा : तमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी, साताऱ्यात राहुट्या लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:06 IST

तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.

ठळक मुद्देतमाशातला राजा; सकाळी डोक्यावर पेटी साताऱ्यात राहुट्या लागल्या चार महिने पोटासाठी कलाकारांची भ्रमंती

सातारा : तमाशा कलेचा गेल्या ५० वर्षांपासूनचा वारसा आहे. कुठे आधार नसल्यामुळेच या तमाशाचा जिवावर दिवस काढावे लागत आहेत. गावोगावच्या देवांच्या जत्रा हेच आमचं जगण्याचं साधन असून तमाशातील राजा अन् सकाळी डोक्यावर पेटी, अशी आमची स्थिती आहे, हे वास्तव मांडले ते गोविंदराव पाटणकर या तमाशा मालकाने.सध्या गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने साताऱ्यातील श्री खंडोबाळाच्या माळावर तमाशा कलावंतांच्या राहुट्या लागू लागल्या आहेत. येथेच गोविंदराव पाटणकर यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना गेल्या ५० वर्षांपासूनचा इतिहास समोर मांडला. तसेच शासनाकडून होणारे दुर्लक्षही कथन केले.पाटणकर म्हणाले, वडील तमाशात कलाकार होते. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात झाली. ३० वर्षांपासून स्वत:चा तमाशाचा फड आहे तर आतापर्यंत ५० वर्षे या कलेसाठी गेली आहेत. पण, खरं सांगायचं झालं तर आम्ही कधीच मोठं झालो नाही. या तमाशाच्या फडावर काहीच भागत नाही.

चार महिन्यांचा हा खेळ असतो. त्यात ३० ते ४० सुपाऱ्या मिळतात. पण, त्यामागील खर्च पाहता हे सर्व झेपत नाही. दररोज ३० ते ३५ माणसांचा कबिला सांभाळायचा असतो. कलाकाराने घर सोडलं की सर्व आम्हालाच बघायला लागतं. त्यात एका सुपारीला ३० ते ३५ हजार रुपये मिळायचे. मग, सर्वांना पैसे देऊन जवळ काहीच राहत नाही. पण, हा व्यवसाय करण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नाही.

आम्हाला घर नाही की शेती नाही. हे चार महिने तमाशा झाला की जिवनाचाही तमाशा होतो. कारण, कुठेही मजुरी, रोजंदार, हमाली अशी कामे करतो. शासनही काही देण्यास तयार नाही. ६५ वर्षांवरील कलाकारांना मानधन मिळते. पण, हे मला तर अद्याप मिळालेले नाही. भारुडाच्या पोटी जन्माला आलेली ही कलाच कशीबशी जगविते. तर दुसरीकडे तमाशातून नाटक पुढे आले.

नाटकातून चित्रपट आले आणि ते सर्वजण अब्जाधीश झाले. पण, आम्हा तमाशा कलाकाराच्या जिवनाचा तमाशाच झाला. पोरं शिकतात, पण, नोकरी तरी त्यांना कुठे मिळते. मग काय तर तमाशातील फळ्या, पेट्या, कपडे उचलता-उचलता ते पण तमाशातीलच कलाकार होतात, अशी आमच्या जीवनाची तऱ्हा आहे.साताऱ्यात आठ दिवस झालेतरी आणखी एकही सुपारी मिळाली नाही. स्पर्धेच्या या जगाचा आम्हाला फटका बसत आहे. त्यामुळे विचार करुन-करुन आता आजारही होऊ लागले आहेत, पण, जगायचं याच ध्येयाने तमाशा जिवंत ठेवला आहे, अशी सलही पाटणकर यांनी यानिमित्ताने बोलून दाखविली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcultureसांस्कृतिक