शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कागल सहापदरीकरणाचा मार्ग सुकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 17:08 IST

कºहाड : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंगळवारी ३ हजार कोटींचा निधी जाहीर केल्याने महामार्गावरची वाहतूक अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे. २००३ साली या महामार्गाचे चार पदरीकरण करतानाच नियोजित सहापदरी मार्गासाठीची जागा अधिग्रहण करून घेतल्याने सहापदरीकरणाच्या कामात अडचणींचे विघ्न येण्याची शक्यता दिसत नाही.

ठळक मुद्देजागा अधिग्रहण झाल्याने अडचणींचे विघ्न नाही महामार्गावरील वाहतूक होणार अधिक सुलभदोन ठिकाणी वाहनतळ केले जाणारकºहाड-मलकापूर-उंब्रजला सवलत...

कºहाड : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंगळवारी ३ हजार कोटींचा निधी जाहीर केल्याने महामार्गावरची वाहतूक अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे. २००३ साली या महामार्गाचे चार पदरीकरण करतानाच नियोजित सहापदरी मार्गासाठीची जागा अधिग्रहण करून घेतल्याने सहापदरीकरणाच्या कामात अडचणींचे विघ्न येण्याची शक्यता दिसत नाही.

दळणवळण सुलभ होण्यासाठी भाजप सरकारने नेहमीच रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २००३ मध्ये सातारा-कागल रस्त्याचे चौपदरीकरण झाले. साहजीकच वाहतुकीला याचा फायदा झाला. परंतू भविष्यात या महामार्गाची रूंदी वाढवावी लागेल हे गृहीत धरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियोजित सहापदरी रस्त्यासाठी म्हणून अगोदरच सात मीटर जागेचे अधिग्रहण करून घेतले आहे. त्याबाबत महामार्गाच्या दुतर्फा रोवलेले दगड हद्द दाखविताना दिसतात. साहजिकच महामार्गाच्या दुतर्फा झालेली नवीन बांधकामे ही नियमानुसारच झालेली दिसतात. त्यामुळे सहापदरीकरण करण्याच्या कामात काही तांत्रिक अडचणी समोर येतील असे वाटत नाही.कºहाड-मलकापूर-उंब्रजला सवलत...

या महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या कºहाड, मलकापूर व उंब्रज या तिन्ही शहरांना २००३ साली चौपदरीकरण करताना चांगलीच झळ बसली आहे. त्याचवेळी ४५ ते ४८ मीटर अशी जागा अधिग्रहण करण्यात आली आहे. पुन्हा सहापदरीकरणासाठी येथे जादा जागा अधिग्रहण होण्याची शक्यता वाटत नाही. त्याऐवजी येथे गरजेनुसार उड्डाणपुलांना प्राधान्य दिले जाईल, असे आजवर याबाबत संघर्ष करणारे येथील नागरिक आवर्जून सांगतात.वाहनतळ कुठे कुठे...

महामार्गावर अवजड वाहने अथवा इतर वाहने रस्त्यावर थांबविली जाऊ नयेत, त्यासाठी सातारा ते कागल दरम्यान दोन ठिकाणी वाहनतळ केले जाणार असल्याचे खात्रीशीर सांगितले जाते. यापैकी एक वाहनतळ सातारा ते कºहाड या दरम्यान होईल. तर दुसरे वाहनतळ कºहाड ते कागल या दरम्यान केले जाईल. असे समजते. मात्र, त्याची जागा निश्चित कोणती करण्यात आली आहे हे कोणीच सांगत नाही.