परळी : ग्राहकांची मागणी असूनही घनसाळ तांदूळ उपलब्ध होत नाही. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील करंजे तर्फ परळीसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी कृषिक्रांती शेतकरी स्वयंसहाय्यता शेतकरी गटाच्या साह्याने भाताच्या घनसाळ जातीची लागवड केली. या शेतकारी गटाने विक्रीसाठी ‘सातारा घनसाळ’ हा तांदळाचा ब्रँड विकसित केला आहे.शहरापासून १७ किलोमीटरवर उरमोडी धरणाच्या कुशीत वसलेले करंजे तर्फ परळी हे निसर्गरम्य गाव. येथील शेतकरी खरिपात भाताच्या पारंपरिक जातींची लागवड करतात. त्यामुळे हाती येणारे भाताचे जेमतेम उत्पादन काळाची गरज ओळखून या गावातील शेतकऱ्यांनी परिस्थिती बदलण्याचे ठरविले. अन् येथील शेतात घनसाळचा सुवास दरवळू लागला. घनसाळ भाताचे दर्जेदार उत्पादन आणि चांगल्या दरामुळे भात शेतीतून शेतकऱ्यांचा आर्थिक नफा वाढला.कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने भाताच्या घनसाळ या जातीची लागवड करतात. सुंदर सुवास आणि अप्रतिम चव यामुळे या तांदळाला चांगली मागणी असते. मात्र, बाजारात ग्राहकांची मागणी असूनही घनसाळ तांदूळ उपलब्ध होत नाही. ही मागणी लक्षात घेऊन करंजेसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी ‘कृषिक्रांती’ गटाच्या मदतीने भाताच्या घनसाळ जातीची लागवड करून ‘सातारा घनसाळ’ हा नवा ब्रँड विकसित केला.या गावाच्या परिसरातील शेतकरी भाताच्या इंद्रायणी, बासमती, सह्याद्री, रत्नागिरी - २४ त्याचबरोबर काळी कुसळी या पारंपरिक जातीची लागवड करतात. मात्र, तांदळाची विक्री करताना अडचणी या शेतकऱ्यांपुढे होत्या. ‘आत्मा’चे संचालक गणेश घोरपडे यांना कृषिक्रांतीचे अध्यक्ष मोहन लाड यांनी भाताच्या जाती, उत्पादन व विक्री संदर्भातील अडचणी सांगितल्या. (वार्ताहर)साताऱ्यात ‘तांदूळ महोत्सव’ सुरू करणारसातारा जिल्हा ‘पॅटर्न जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्याच्या हक्काच्या तांदूळ उत्पादनाला चांगला दर मिळावा म्हणून कृती विभागाने ‘तांदूळ महोत्सव’ सुरू केला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हा तांदूळ महोत्सव बंद झाला आहे. महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
‘सातारा घनसाळ’ तांदळाचा ब्रँड विकसित
By admin | Updated: January 10, 2015 00:13 IST