शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा फूटपाथवर टपरी; रस्त्यावर पादचारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:20 IST

सातारा : शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे.

ठळक मुद्देपालिका, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सातारा : शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आवासून उभा राहिला आहे.पालिका व बांधकाम विभागातील कर्मचाºयांच्या सोयीच्या कारभारामुळे टपरीबहाद्दरांना रान मोकळे पडले आहे. या रस्त्याचे मोठ्या थाटात चौपदरीकरण करण्यातआले.

बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमण हटविण्यात आले. एवढेच काय बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर असणारे महाकाय वडाचे झाडही तोडून टाकण्यात आले. या रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र, या फूटपाथवर पुन्हा अतिक्रमणे बोकाळू लागली आहेत.

जिल्हा परिषद सभापती निवासाच्या बाहेरच्या फूटपाथवरच आता खोकी थाटलेली पाहायला मिळत आहेत. या रस्त्यावर वाहनांचा वेग मोठा असतो. पादचाºयांना फूटपाथवरून चालण्याशिवाय पर्याय नाही. आता या खोक्यांमुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालय याचा परिसरात असल्याने येथे मोठी गर्दीही असते.

पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मात्र पालिका किंवा बांधकाम विभागाची यंत्रणा मात्र कारवाई का करत नाही, यात नेमके काय काळे बेरे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फूटपाथवर मांडलेली खोकी कुणाच्या आशीर्वादाने आली? तसेच याला पालिका व बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाºयांची फूस आहे का? यातून निर्माण होणारा काळाबाजार जनतेसमोर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कारवाई करण्याची अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथवरील टपºया हटवाव्यात.फुटकळ चिरीमिरीवाले उघडे पाडाफूटपाथवर अतिक्रमण करायला लावणारे फुटकळ चिरीमिरीवाले पालिका प्रशासनात कार्यरत झाले आहेत. अतिक्रमण विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे समोर येत आहे. पालिका हद्दीतल्या या अतिक्रमणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशेने बोटे दाखविले जात आहेत. नगराध्यक्षांनीच आता झारीतले शुक्राचार्य बाहेर काढावेत, अशी मागणी होत आहे.