शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे शेती कर्ज थकीत

By admin | Updated: June 12, 2017 16:43 IST

कर्जमाफीच्या निकषांकडे लक्ष : ५९ हजार १९९ थकबाकीदारांना मिळू शकतो दिलासा

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १२ : जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर ३३ बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यात मार्च २0१७ या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत २ हजार ६८४ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कजार्चे वाटप झाले आहे. यापैकी १५४ कोटी ३१ लाखांचे कर्ज थकि आहे. शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे थकबाकीत गेलेल्या कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. तसेच सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला गेल्यास ३ लाख २६ हजार ५९३ शेतकरी कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीचा विषय गाजत आहे. राष्ट्रवादी-काँगे्रससह इतर विरोधी पक्षांनी राज्यभर काढलेली संघर्ष यात्रा, सत्तेत सहभागी असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी काढलेली आत्मक्लेश पदयात्रा, शिवसेनेनेही सरकार पाडण्याचा दिलेला इशारा तसेच शेतकरी आत्महत्येचे सुरु असेलेले सत्र या बाबींमुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडले आहे. दरम्यान, कर्जमाफीची मागणी चहूबाजूंनी वाढू लागल्याने शेती कर्जे थकित गेल्याचा सार्वत्रिक अनुभव जिल्हा मध्यवर्ती बँकांसह पीक कर्ज देणाऱ्या इतर बँकांना अनुभवायला मिळाला.

जिल्ह्यामध्ये ३ लाख २६ हजार ५९३ शेतकऱ्यांनी २ हजार ६८४ कोटी १३ लाख इतक्या मोठ्या रकमेची पीक कर्जे घेतली होती. त्यापैकी ५९ हजार १९९ शेतकऱ्यांनी १५४ कोटी ३१ लाखांची थकबाकी ठेवली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून प्रामुख्याने जिल्ह्यात पीक कजार्चे वाटप केले जाते. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बँक कर्जवाटप करते, तसेच याच यंत्रणेच्या माध्यमातून ती वसुलही केली जातात. साखर कारखान्यांकडून मिळणारे ऊसाचे पेमेंट जिल्हा बँकांमध्ये जमा होत असते. त्यामुळे साहजिकच कजार्ची वसूली करुन उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला वसुलीची चिंता सतावत नाही. मात्र, इतर पिकांसाठी दिलेल्या कजार्ची वसुली करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. विरोधी पक्षांसह सत्तेत असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांनी सरकारला हादरे दिल्याने कर्जमाफीच्या निर्णयापर्यंत सरकारला पोहोचावेच लागले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता कर्ज भरण्याऐवजी अनेकांनी ती माफ कधी होतील, याकडे डोळे लावले.

जिल्हा बँकेचे दोन महिन्यांत १५ कोटींची वसुली

कर्जमाफीची चर्चा सुरु झाल्यानंतर काही शेतकरी कर्ज माफीकडे डोळे लावून बसले. एप्रिल व मे या दोन महिन्यांत कजार्ची वसुली ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दोन महिन्यांत केवळ १५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. ५९ हजार १९९ शेतकरी सभासद थकबाकीत गेले.

३७१.३४ कोटींच्या वाटपाचे काय होणार?

बँकांनी १ एप्रिल २0१७ ते ३१ मे २0१७ या कालावधीत १ लाख ५ हजार ३0९ शेतकऱ्यांना ३७१.३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सरकारच्या निर्णयामध्ये या कजार्चा समावेश असणर का? याबाबत चर्चा सुरु आहे.