शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातारचा बिल्डर निघाला पुण्याला!

By admin | Updated: October 31, 2014 23:17 IST

चारही बाजूने पिळवणूक : सरकारी कार्यालयात अडवणूक अन् खंडणीबहाद्दरांकडून छळवणूक

सातारा : प्रचंड फायदेशीर वाटणारा बांधकाम व्यवसाय आज विविध कारणांनी अडचणीत आला असून, अनेक बिल्डर पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. जमीन खरेदीपासूनच या व्यवसायात विघ्नांना सुरुवात होत असून, ‘मिल बाँट के खाओ’ कार्यशैलीमुळे या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत असलेल्या फायलींना नोटांचे पंख लावावे लागत आहेत. याखेरीज खरेदीदारांची संख्या रोडावणे, रखडलेली हद्दवाढ, रेडी रेकनरपेक्षा कमी मिळणारा दर, त्याहून अधिक दराने भरावा लागणारा कर यांसह अनेक समस्यांनी बांधकाम व्यावसायिकांना पोखरले आहे.सातारा शहरातील बांधकाम व्यावसायिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा ‘लोकमत’ने वेध घेतला असता, जमीन खरेदीव्यवहारातच पहिली माशी शिंकते, असे लक्षात आले आहे. एक तर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव विविध हितसंबंधीयांनी रोखून धरल्यामुळे बरीच बांधकामे सध्या शहराच्या हद्दीबाहेरच सुरू आहेत. या भागातील जमीन खरेदी करणे, बिगरशेती परवाना मिळविणे आणि अंतिमत: बांधकाम परवाना मिळविणे, या प्रक्रियेतच बिल्डरांची दमछाक होत आहे. शहरात सुमारे चाळीस ते पन्नास नावाजलेले बिल्डर व्यवसाय करतात. जुने वाडे पाडून अपार्टमेन्ट बांधण्याचाच व्यवसाय बरेच दिवस सुरू राहिल्यामुळे आणि तो फायदेशीर वाटल्याने आर्किटेक्ट, डॉक्टर, वकील अशा इतर व्यवसायातील अनेक व्यक्ती बिल्डर बनल्या. शहराच्या औद्योगिक विकासाला असलेल्या मर्यादांमुळे भांडवल अडकून पडू लागले आणि सुरुवातीला फायदेशीर वाटलेल्या या व्यवसायात आर्थिक फुगा निर्माण होऊन हळूहळू तो अनेक समस्यांच्या भोवऱ्यात सापडला. शहराबाहेरची जमीन घ्यायची झाल्यास ती बिगरशेती करून घ्यावी लागते. त्यासाठी अनेक कार्यालयांचा ना-हरकत दाखला घेण्याची सक्ती आहे. इथेच ‘मिल बाँट के खाओ’ या कार्यशैलीचा पहिला अनुभव बिल्डरला येतो. परिसरातून उच्चदाब वाहिनी जात नाही ना, असा वीजवितरण कंपनीचा दाखला लागतो. शिवाय नगररचना खाते, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक कार्यालयांमधून फाईल फिरत राहते. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल येते. गंमत म्हणजे, जिल्हाधिकारी हे सर्वाधिकारी असतानासुद्धा त्यांच्या परवानगीनंतर पुन्हा संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेण्याची अट, कोणताही तार्किक आधार नसताना घालण्यात आली आहे. त्यानंतर बांधकाम परवान्यासाठी हेलपाटे सुरू होतात. अनेक ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हात ओले केल्यानंतर बांधकाम परवाना मिळतो. म्हणजेच, या व्यवसायातील ‘कच्चा माल’ मानल्या गेलेल्या जमिनीतच भरपूर ‘गुंतवणूक’ केल्यानंतर प्रत्यक्ष इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होते. (प्रतिनिधी)