शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

साताऱ्याची बालरंगभूमी येतेय ‘वयात’!

By admin | Updated: December 23, 2015 01:31 IST

उपक्रमशीलता वाढली : समर्थ करंडक एकांकिका स्पर्धेत यंदा सादर होणार जिल्ह्यातील तब्बल चार बालनाट्ये

राजीव मुळ्ये - सातारा  -उपक्रमशील बालरंगभूमी हे भविष्यातील नाट्यसंस्कृतीच्या वैभवाचं निदर्शक मानलं जातं. साताऱ्याची नाट्यचळवळ काहीशी थंडावली असल्याचा अनुभव काही वर्षांपासून येत असतानाच येथील उपक्रमशीलता अचानक वाढली आहे. विशेषत: बालरंगभूमीवर काम करणाऱ्यांची संख्या वाढत असून, शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या समर्थ करंडक एकांकिका स्पर्धेत जिल्ह्यातील चार बालनाट्यांचा सहभाग निश्चित झाला आहे.डिसेंबर-जानेवारी हा एकांकिका स्पर्धांचा हंगाम असतो. या काळात स्थानिक रंगकर्मी एकत्र येऊन एकांकिकेची जुळणी करण्यात मग्न असतात. स्पर्धेच्या निमित्तानं सादर होणाऱ्या प्रयोगांमधून उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ रंगभूमीला मिळतात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे होणारी समर्थ करंडक एकांकिका स्पर्धा गेली तेरा वर्षे सुरू असून, स्थानिकांचा सहभाग मात्र गेली काही वर्षे रोडावला होता. यावर्षी साताऱ्यातूनच दहा संघ उतरणार आहेत. यातील तीन संघ लहान मुलांचे असून, वाईतील लहानग्यांचा एक संघही यंदा हजेरी लावणार आहे. नव्वदीच्या दशकाच्या मध्यापर्यंत साताऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात जी प्रचंड हालचाल होती, तीच यंदा पुन्हा पाहायला मिळत आहे. त्यातही बालरंगभूमीवरील हालचाल अधिक आश्वासक आहे. साताऱ्याच्या आकाश कला अकादमीतर्फे ‘कॉम्प्लेक्स’ ही एकांकिका सादर केली जाणार आहे. इमारतींच्या जंजाळात शहरातली मैदानं कमी होत असताना चिमुकल्यांची होत असलेली घालमेल सांगणारी ही एकांकिका नकळत मुलांच्या बदलत्या ‘माइंडसेट’चाही कानोसा घेते.ग्रुपमधील सर्वांना त्रास देणाऱ्या थोराड मुलाविरुद्ध इतर मुलं एकत्र येतात; पण तेवढ्यात त्याच्यावरच संकट आल्यामुळं शेवटी त्याला मदतच करतात, अशी कथा असलेली ‘खेळ मांडियेला’ एकांकिका सातारच्या लोकमंगल हायस्कूलची मुलं सादर करतायत. वाईच्या ‘प्रतीक थिएटर्स’ने ‘फुलपाखरू’ एकांकिका बसवलीय. विकलांग भावाला आईवडील जास्त जपतात म्हणून त्याचा रागराग करणाऱ्या लहान भावाचं मतपरिवर्तन करणाऱ्या घटनांची शृंखला यात चित्रित केलीय. बारामतीला खुल्या गटात वाईच्या लहानग्यांनी पहिला नंबर पटकावलाय. शिक्षकांना दिग्दर्शन करतोय विद्यार्थीअनंत इंग्लिश स्कूलचा चमू ‘मला बी जत्रंला येऊद्या की रं’ ही एकांकिका सादर करीत आहे. पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळं मान मोडेपर्यंत अभ्यास करणाऱ्या मुलाची इतर मुलं सहलीला जाताना पाहून होणारी मन:स्थिती चित्रित करण्याचा प्रयत्न एकांकिकेत केलाय. विशेष म्हणजे आदित्य मोरे हा विद्यार्थी त्याच्या शिक्षकांना दिग्दर्शन करीत आहे. शाळेतील दोन शिक्षक एकांकिकेत भूमिका करीत असून, एक शिक्षक संगीताची बाजू सांभाळत आहेत.स्वतंत्र विभाग नसताना...बालनाट्यासाठी समर्थ करंडक स्पर्धेत विशेष विभाग नाही. म्हणजे खुल्या गटातच लहानग्यांना उतरायचं आहे. बालकलावंताचं बक्षिस असलं, तरी बालनाट्यासाठी वेगळं बक्षिस नाही. तरीही जिल्ह्यातील तब्बल चार बालनाट्यं प्रथमच या स्पर्धेत उतरत आहेत. दरम्यान, स्पर्धेला महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ४९ संघांनी सहभागासाठी अर्ज केले होते. तथापि, सर्वांना प्रवेश देणं शक्य नसल्यामुळं प्रथम आलेल्या २९ संघांचा सहभाग संयोजकांनी सुनिश्चित केला आहे.