शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा होणार ‘ग्रीन सिटी’

By admin | Updated: April 9, 2016 00:14 IST

पर्यावरणाचा समतोल : रस्त्याकडेला लावली जाणार पाच हजारांहून अधिक झाडे

दत्ता यादव -- सातारा -‘एलईडी सिटी, स्वच्छ सुंदर,’ सातारा अशी एकापोठापाठ एक विकासकामे आपल्या नावावर कोरणाऱ्या सातारा पालिकेला आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण एलईडी सिटी करण्याचा मान सातारा पालिकेला मिळाला असतानाच आता सातारा ही ‘ग्रीन सिटी’ म्हणून ओळखली जाणार आहे. शहरातील रस्त्यांवर पाच हजारांहून अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अजिंक्यताऱ्यावरून सातारा हिरवागार दिसणार आहे.केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून हा ग्रीन सिटीचा प्रोजेक्ट राबविण्यात येत असून, यासाठी सातारा पालिकेला तब्बल एक कोटीचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे सातारा ही ‘ग्रीन सिटी’ होण्यासाठी आता केवळ औपचारिकता बाकी आहे. तीस फुटांच्यावर रुंद असणारे रस्ते या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. जवळपास शहरातील सर्वच रस्ते यासाठी पात्र ठरले असून, रस्त्याकडेला ही झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी डिव्हाईडर असेल तेथेही रस्त्याच्या मध्यभागी झाडे लावण्यात येणार आहेत. यापूर्वी आपण हायवेवरून जाताना प्रवास अल्हाददायक वाटत होता; मात्र आता शहरामध्येही याची अनुभूती प्रत्येकाला मिळणार असल्याने सातारकरांच्या दृष्टीने ही एक अभिमानाची बाब ठरली आहे. ‘ग्रीन सिटी’चा उद्देश पर्यावरणाचा समतोल राखला जावा, हा असला तरी ही ‘ग्रीन सिटी’ पाहून ताजेतवाणे आणि निरोगी राहण्यासाठी सातारकरांना मदत मिळणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी रखरखत्या उन्हाच्या ज्वाळा सातारकरांना अंगावर झेलाव्या लागत होत्या; मात्र या ‘ग्रीन सिटी’मुळे शहराचे तापमानही कमी राहणार आहे. शिवाय हवेत गारवा आणि शहराच्या सुंदरतेतही आणखीनच भर पडणार आहे. चिंच, वड, जांभूळ, कडूलिंब आदी झाडे लावण्यात येणार आहेत. हे काम ठेकेदाराकडून पूर्ण करण्यात येणार असून, झाडांची देखभालही ठेकेदारच करणार आहेत. त्यामुळे झाडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न साहजिकच मिटला आहे.शहरातील बागांही फुलणार !या ‘ग्रीन सिटी’च्या माध्यमातून शहरातील रस्त्यावर आपल्याला झाडे पाहायला मिळणारच आहेत. या शिवाय ओस पडलेल्या बागांनाही आता नवसंजीवनी मिळणार आहे. गेंडामाळ बाग, सदर बझारमधील आयुर्वेदिक बाग, गोडोली तलाव, सुमित्राराजे उद्यान, महादरे तलाव, हुतात्मा गार्डन, सांबारवाडी, पॉवर हाउस, जकातवाडी जलशुद्धीकरण केंद्र तसेच सोनगाव कचरा डेपोमध्येही २ हजार २७८ झाडे लावण्यात येणार आहेत.साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ‘ग्रीन सिटी’ प्रोजेक्टमुळे साताऱ्याच्या लौकिकात आणखीनच भर पडणार आहे. येत्या काही दिवसांतच शहरात सर्वत्र झाडे लावण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.- अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिका