शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता मात्र सातारकरांची सटकली!

By admin | Updated: October 24, 2015 00:47 IST

तरुणाई खवळली : वर्दीवरील हल्ला असह्य; सहायक फौजदारास मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

सातारा : वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस फौजदाराला बुधवारी झालेली मारहाण सातारकरांनी केवळ पाहिली नाही. वर्दीवर हल्ला होताना पाहून महाविद्यालयीन तरुणांची सटकली आणि मारहाण करणाऱ्या तिघांना या तरुणांनी यथेच्छ झोडपले. वर्दीवरील हल्ले आम्ही उघड्या डोळ््यांनी पाहणार नाही, हा संदेशच सातारकरांच्या वतीने या तरुणांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित सहायक फौजदाराला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक झाली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बशीर अमीनुद्दीन मुल्ला (वय ५७) बुधवारी सायंकाळी पोवई नाका परिसरात मारहाण झाली. याप्रकरणी त्याच दिवशी अटक केलेल्या तीन जणांवर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीवरून ‘ट्रिपलसीट’ जाताना पकडल्यानंतर ही मारहाण झाली होती. विशाल दत्तात्रय सुतार (वय २१, रा. गेंडामाळ झोपडपट्टी), शुभम उद्धव इंदलकर (वय २२, रा. कळंबे, ता. सातारा) आणि शाहरुख अस्लम शेख (वय २७, रा. यश ढाब्यामागे, मेढा रस्ता, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.बुधवारी सायंकाळच्या सुमारास सहायक फौजदार मुल्ला (वय ५७) यांची ड्यूटी पोवई नाका परिसरात होती. मोनार्क हॉटेलकडून मरिआई कॉम्प्लेक्सच्या मागील रस्त्याने एका मोटारसायकलवरून तिघेजण येत असल्याचे पाहून मुल्ला यांनी त्यांना अडविले. त्यामुळे चिडून जाऊन त्या तिघांनी मुल्ला यांनाच धक्काबुक्की सुरू केली. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही महाविद्यालयीन युवकांनी हे दृश्य पाहून धाव घेतली आणि मारहाण करणाऱ्या तिघांना चोप दिला. त्यानंतर रात्री उशिरा या तिघांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.वाहतूक पोलिसांना उद्धटपणे बोलणे, त्यांच्यासमोर बड्यांना फोन करणे, हुज्जत घालणे, प्रसंगी धक्काबुक्की करणे असे प्रकार शहरात वाढत असतानाच जागरूक सातारकर तरुणांनी पोलिसांना मदत करून या तिघांना चोप दिल्याने अशा घटना लोक नुसतेच पाहत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी म्हणजे आपले ‘कॉन्टॅक्ट’ दाखविण्याचे केंद्र अशीच बड्या धेंडांची समजूत आहे. या वृत्तीतूनच नियम मोडणारे पोलिसांनाच फैलावर घेताना चौकाचौकात दिसतात. काही दिवसांपूर्वी राधिका रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेलेल्यांची छायाचित्रे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. पोवई नाका, मोती चौक, कमानी हौद, शनिवार चौक अशा ठिकाणी विशेषत: एकेरी वाहतूक सुरू असताना अशा घटना वारंवार घडतात. परंतु बुधवारी संध्याकाळी पोवई नाक्यावर महाविद्यालयीन युवकांनी ज्याप्रमाणे सक्रिय सामाजिक हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारून वर्दीच्या अवमानाला जे चोख प्रत्युत्तर दिले, तो अशा प्रवृत्तींविरुद्धचा सातारकरांचा एल्गार ठरला आहे. (प्रतिनिधी)थांब हवालदारा, फोन लावतो...वाहतूक पोलिसाशी बोलताना अनेकदा उच्चपदस्थांशी आणि नेत्यांशी आपली असलेली सलगी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, पोलिसांचा डोळा चुकवून ‘नो एन्ट्री’तून बिनधास्त घुसणे, थोडक्यासाठी वळसा कशाला घालायचा अशा वृत्तीने वाहतुकीच्या नियमांची राजरोस पायमल्ली करणे साताऱ्यात नित्याचे झाले आहे. पोलिसांनी पकडून लायसेन्स वगैरेची मागणी केल्याबरोबर संबंधित व्यक्ती लगेच खिशातील सेलफोन काढून उच्चपदस्थ अधिकारी किंवा नेत्यांना कॉल लावतात. तोच फोन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात दिला जातो आणि त्यावरून मिळणारा ‘संदेश’ ऐकून पोलीस कारवाई न करता वाहनधारकाला सोडून देतो.‘त्यांचे’ मोबाइल काढून घ्यावाहतुकीचे नियम सर्वांसाठी समान आहेत आणि नियमांचा भंग कोणीही केला तरी सर्वांनाच त्रास होतो. नियम कोणीही तोडला तरी अपघाताची शक्यता असते. अशा वेळी बड्यांशी असलेल्या संबंधांचा वापर करून पोलिसांवर रुबाब झाडणाऱ्यांना लायसेन्स मागण्याआधी त्यांचे मोबाइल काढून घ्यावेत, अशी चर्चा सातारकरांमध्ये सुरू आहे.