शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या माहेरात पिकांना सासुरवास!

By admin | Updated: September 4, 2015 20:25 IST

वाई तालुका : पिके वाळू लागली; धोम-बलकवडीची पाणी पातळी खालावली, शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

अनिकेत गाढवे -पसरणी  --पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि त्याच्या पायथ्याला असणाऱ्या धोम धरण परिसरात दरवर्षी जोरदार पावसाची हजेरी असते; मात्र यंदा पावसाने या भागातच दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. गतवर्षी या महिन्यात धोम-बलकवडी धरण शंभर टक्के भरले होते. यंदा पावसानेच अवकृपा केल्याने दोन्ही धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.वाई तालुक्यातील पसरणी, चिखली, बोरगाव, आकोशी, वाशिवली, आसरे अशा व आजूबाजूंच्या गावातील शेतकऱ्यांची सोयाबीन, भात, बटाटा, घेवडा, भुईमूग अशी पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. पावसाच्या आगमनाच्या महिन्यात आठ दिवस पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यावरच पेरणी झाली. सर्व खरिपाची पिके चांगली आली. मात्र, पिकांना ज्यावेळी खरंच पाण्याची गरज होती त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कृषिपंप सुरू करून आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे, ते आपल्या पिकांना पाणी सोडत आहेत. मात्र, ज्यांना पाणी सोडण्याची व्यवस्था नाही, त्या शेतकऱ्यांना आपली वाळत चाललेली पिके पाहण्यावाचून काही पर्याय उरलेला नाही. एकीकडे शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकाच्या बियाण्यांचे दर खूप महाग होते. त्यात रासायनिक खते, मजुरी, मेहनत आदीचा खर्च पाहता उत्पन्न तर नाहीच; पण शेतीसाठी झालेला खर्चही निघणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. धोम धरणाची पाण्याची पातळी खालावली आहे. धोम जलाशयातून अनेक उपसा सिंचन योजना प्रकल्प आहेत. मात्र, यंदा पाण्याची पातळी अजून खालीच असल्याने कृषिपंपाद्वारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यात अनेक अडचणी येत आहेत.सर्वच पिकांना फटका...वाई तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे दरवर्षी पाऊस पडणारे ठिकाण. पण, यंदा या परिसरात पाऊस कमी झाला आहे. जून महिन्यात सुरूवातीला काही पाऊस झाला. त्यानंतर पावसाने हुलकावणीच दिली आहे. सध्या या परिसरात भात, सोयाबीन, घेवडा अशी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ही पिके चांगल्याप्रकारे उगवूनही आली आहेत. पण, पावसाने दडी मारल्याने या पिकांना पाणी कसे मिळणार या विवंचनेत येथील शेतकरी आहे. काही शेतकरी विहिरीतील पाण्यावर पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.