शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

नव्वद गावातील सरपंच आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

कोरेगाव : तालुक्यातील १४२ गावांच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी सोडत काढण्यात आली. यावेळी तब्बल ९० गावांमधील सरपंचपद खुले झाले असून, ...

कोरेगाव : तालुक्यातील १४२ गावांच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी सोडत काढण्यात आली. यावेळी तब्बल ९० गावांमधील सरपंचपद खुले झाले असून, त्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. विविध संवर्गासाठी ५२ गावांचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. या आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी प्रशासनावर प्रश्‍नांची सरबती केली. मात्र, नियमांचे दाखले दिल्यानंतर सर्वजण शांत झाले. या आरक्षण सोडतीत मोठमोठ्या गावांना धक्का बसला आहे.

येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलामध्ये प्रांताधिकारी ज्योती पाटील व तहसीलदार अमोल कदम यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. चिठ्ठी काढण्यासाठी शालेय विद्यार्थिनी रिया माने व पूर्वा किरपेकर यांना प्रशासनाने आणले होते. निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांनी प्रोजेक्टरद्वारे गावनिहाय १९९५ आणि २०१५पासून केलेल्या आरक्षणाची माहिती दिली. अमोल कदम यांनी गावनिहाय माहिती देऊन, शासनाचे मार्गदर्शन आणि नियम यांची माहिती दिली. त्यानंतर आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. मोठमोठ्या गावांमध्ये सर्वसाधारण वगळता इतर आरक्षण जाहीर झाल्याने अनेक राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पंचाईत झाली. त्यांनी विविध शंका उपस्थित केल्या, त्यांचे निरसन अमोल कदम यांनी केले.

प्रवर्गनिहाय गावांचे आरक्षण असे : सर्वसाधारण : मोरबेंद, राऊतवाडी, अंबवडे संमत कोरेगाव, अपशिंगे, आसगाव, किन्हई, खडखडवाडी, गोळेवाडी, घिगेवाडी, चांदवडी, चौधरवाडी, जगताप नगर, जांब बुद्रुक, तांदुळवाडी, दहीगाव, दुधनवाडी, देऊर, नलवडेवाडी (तारगाव), नलवडेवाडी (बिचुकले), नायगाव, न्हावी बुद्रुक, पाडळी स्टेशन (सातारा रोड),फडतरवाडी, बिचुकले, बोधेवाडी (चिमणगाव), बोधेवाडी (भाडळे), बोरगाव, बोरजाईवाडी, मंगळापूर, मध्वापूरवाडी, मुगाव, मोहितेवाडी, रामोशीवाडी, रिकिबदारवाडी, रेवडी, वडाचीवाडी, वाघजाईवाडी, वेळू, शिरढोण, साठेवाडी, सायगाव (धामणेर), सुर्ली, सुलतानवाडी, होलेवाडी, हासेवाडी. सर्वसाधारण महिला : अंबवडे संमत वाघोली, अंभेरी, अनपटवाडी, आझादपूर, आसनगाव, आसरे, एकंबे, एकसळ, करंजखोप, काळोशी, किरोली, कोंबडवाडी, कोलवडी, खामकरवाडी, गुजरवाडी (पळशी), गोडसेवाडी, चंचळी, चवणेश्‍वर, चिमणगाव, चिलेवाडी, जांब खुर्द, जाधववाडी, तांबी, तारगाव, त्रिपुटी, दरे, धुमाळवाडी (नांदगिरी), नागेवाडी, निगडी, पिंपोडे खुर्द, पिंपोडे बुद्रुक, बेलेवाडी, बोबडेवाडी, भाटमवाडी, भाडळे, भीमनगर, भिवडी, रणदुल्लाबाद, वाघोली, विखळे, वेलंग (कण्हेरखेड), शिरंबे, शेल्टी, सांगवी, सिध्दार्थनगर.

नागरिकांचा मागार्स प्रवर्ग (खुला) : अनभुलेवाडी, कठापूर, कवडेवाडी, खिरखिंडी, गुजरवाडी (तळिये), गोगावलेवाडी, घाडगेवाडी, टकले, तडवळे संमत कोरेगाव, दुघी, दुर्गळवाडी, न्हाळेवाडी, पवारवाडी, बोरीव, भंडारमाची, ल्हासुर्णे, शेंदुरजणे, सायगाव (एकंबे), सासुर्वे.

नागरिकांचा मागार्स प्रवर्ग महिला : अरबवाडी, कण्हेरखेड, खेड (नांदगिरी), जरेवाडी, जायगाव, नांदवळ, परतवडी, पळशी, पेठ किन्हई, बनवडी, बर्गेवाडी, भक्तवडी, भाकरवाडी, भावेनगर, रुई, वाठार स्टेशन, वेलंग (शिरंबे), सर्कलवाडी, हिवरे.

अनुसूचित जाती : आर्वी, वाठार किरोली, साप, पिंपरी, चौरगेवाडी, कुमठे. अनुसूचित जाती महिला : तळिये, नागझरी, भोसे, जळगाव, सोनके, धामणेर, तडवळे संमत वाघोली. अनुसूचित जमाती : सोळशी.