शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जगविल्यास घरपट्टी भरणार सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:14 IST

मसूर : कºहाड तालुक्यात दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाडळी-हेळगाव येथील सरपंच सुरेखा जाधव यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ...

मसूर : कºहाड तालुक्यात दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाडळी-हेळगाव येथील सरपंच सुरेखा जाधव यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये त्यांनी जे ग्रामस्थ पाडळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्याकडेला पाच झाडे लावून त्याची वर्षभर जोपासना करतील, त्या ग्रामस्थांची वर्षभराची घरपट्टी सरपंच सुरेखा जाधव स्वत: भरणार आहेत. ग्रामस्थांनी ही झाडे २० जुलैपर्यंत लावावीत, असेही आवाहन सरपंच जाधव यांनी केले आहे.पाऊसमान कमी झालेल्या पाडळी गावचे नंदनवन करण्यासाठी सरपंच सुरेखा जाधव यांनी उचललेले पाऊल महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकते. कºहाड उत्तर मतदार संघातील शेवटचे टोक असलेले पाडळी गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे आहे. या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: टाहो फोडावा लागतो. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गावाची पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढवताना त्यांनी गावच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. या निवडणुकीतील आश्वासनाला स्मरून नुकताच त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला त्यांनी ‘ग्रामपंचायत पाडळी वृक्षमित्र योजना’ असे नाव दिले आहे.ग्रामस्थांना फक्त पाच झाडे लावून ती जगवावी लागणार आहेत. त्याच्या मोबदल्यात सरपंच सुरेखा जाधव संबंधित ग्रामस्थाची पूर्ण वर्षाची घरपट्टी स्वत: भरणार आहे. तसेच सर्व प्रकारचे दाखले विनामूल्य देणार आहेत. झाडांची आणि वर्षभर संगोपन केल्याची नोंद स्वत: सरपंच आणि ग्रामपंचायत घेणार आहे.महाराष्ट्रात सर्वत्र वृक्षलागवडीचे उपक्रम सुरू आहेत. वृक्षलागवडीचा फार्स न करता जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन होणे गरजेचे असते. या प्रक्रियेमध्ये लोकसहभाग असल्याशिवाय हे कार्य शक्य नाही. ही बाब ध्यानात घेऊन कºहाड तालुक्यातील पाडळी गावच्या सरपंच सुरेखा जाधव यांनी हा आगळावेगळा संकल्प हाती घेतला आहे.वृक्षारोपण व त्याच्या संगोपनाची भावना ग्रामस्थांमध्ये वृद्धिंगत व्हावी, या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होऊन वृक्ष लागवडीचा आदर्श घालून द्यावा आणि हरितक्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.- सुरेखा जाधव, सरपंच, ग्रामपंचायत पाडळी