शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:49 IST

कराड तालुक्यातील एकूण १०४ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याचा निकालही जाहीर झाला. त्यानंतर २९ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात ...

कराड तालुक्यातील एकूण १०४ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याचा निकालही जाहीर झाला. त्यानंतर २९ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावोगावी सत्तास्थापनेची मोर्चेबांधणी सुरू झाली. निवडणुका झालेल्या सर्व गावांना सरपंच निवडीची प्रतीक्षा लागून होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान सरपंच निवडी घेण्याच्या सूचना केल्या. मात्र काही ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीची सुनावणी घेतली. त्यानंतर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी २३ व २४ तारखेला होणार असल्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार कराडचे तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी तालुक्यातील सर्व १०४ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी २३ व २४ रोजी घेण्याचे जाहीर केले. मंगळवार, दि. २३ रोजी सरपंच निवडी होणारी गावे पुढीलप्रमाणे : हजारमाची, किरपे, विंग, कार्वे, मुंढे, ओंड, शेरे, मालखेड, घारेवाडी, खुबी, गायकवाडवाडी, शहापूर, म्हासोली, कालवडे, साकुर्डी, जखिणवाडी, भोळेवाडी, धोंडेवाडी, पोतले, साळशिरंबे, शेवाळवाडी (म्हासोली), सवादे, केसे, घोगाव, गोटेवाडी, कोणेगाव, शिवडे, वस्ती साकुर्डी, उंब्रज, इंदोली, मरळी, तासवडे, शिरवडे, शिरगाव, वहागाव, तांबवे, खराडे, पाल, साजुर, गोळेश्वर, वारूंजी, चिखली, वाठार, कोळे, सैदापूर, येरवळे, गोटे, नांदलापूर, काले, उंडाळे, पार्ले, निगडी, बनवडी, पेरले, विरवडे, करवडी, कोडोली, गोवारे, बेलवडे हवेली.

बुधवार, दि. २४ रोजी सरपंच निवड होणारी गावे अशी : कामथी, येणके, शिंदेवाडी (विंग), जिंती, शेणोली, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, गमेवाडी, बेलदरे, म्होप्रे, नांदगाव, महारुगडेवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), शेवाळवाडी (उंडाळे), पाडळी केसे, टाळगाव, भुरभुशी, रिसवड, भवानवाडी, अंबवडे, खालकरवाडी, हरपळवाडी, वडगाव उंब्रज, वराडे, वडोली निळेश्वर, चोरे, खोडशी, अबईचीवाडी, नवीन कवठे, खोडजाईवाडी, कोपर्डे हवेली, बेलवडे बुद्रूक, बामनवाडी, पाचुंद, चचेगाव, वसंतगड, भरेवाडी, चौगुलेमळा, अक्काईचीवाडी, हणबरवाडी, भुयाचीवाडी, वाघेरी व सुर्ली.

ज्या त्या गावचे निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच निवडीच्या सभेची नोटीस सर्व सदस्यांना देतील. त्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर दोन वाजता सभेस सुरुवात होईल. त्यानंतर दाखल अर्जांची छाननी, अर्ज माघार व त्यानंतर एकपेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज निवडणूक रिंगणात राहिल्यास मतदान अशी प्रक्रिया होणार आहे.