कऱ्हाड तालुक्यात बेलवडे बुद्रुक ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील उंडाळकर व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांच्या पॅनलने सत्ता मिळवली. आरक्षण सोडतीच्या वेळी खुल्या प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले. त्यामुळे सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते यांची निवड निश्चित मानली जात होती. त्याप्रमाणे डाॅ. मोहिते यांची निवड झाली, तर उपसरपंचपदासाठी मंदाकिनी वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विनोद पुजारी यांनी सरपंचपदी डॉ. सुशांत मोहिते व उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. निवडीनंतर सरपंच व उपसरपंच यांचा जगन्नाथराव मोहिते, हर्षवर्धन मोहिते, डॉ. संपतराव मोहिते, एड. भारत मोहिते, एड. जे. बी. मोहिते आदींनी सत्कार केला.
फोटो : २६बेलवडे सरपंच