शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सर्जा रंगात रंगला.. राजाही मिरवणुकीत रमला!

By admin | Updated: July 19, 2016 00:22 IST

जिल्ह्यात बेंदूर उत्साहात : ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका; विविध संदेशातून पर्यावरण जनजागृती

सातारा : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर हा सण सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यांच्याकडे बैलं नाहीत अशा घरांमध्ये मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली तर अनेक ठिकाणी आपल्या सर्जा-राजाची अगदी थाटामाटात, वाजत-गाजत, अंगावर नवी झूल टाकून, शिंगांना व शरीराला रंगरंगोटी करून, पायात घुंगरू बांधून त्यांची मिरवणूक काढली. बेंदूर सणाची लगबग घराघरांमध्ये पहाटेपासूनच सुरू झाली. प्रारंभी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांना अंघोळ घातली. शिंगाला रंग लावून त्यांच्या अंगावर झूल टाकली. तसेच पायात घुंगरू बांधून बैलांच्या शरीरावर रंगांची उधळण केली. यानंतर पारंपरिक पद्धतीने बैलांची विधीवत पूजा केल्यानंतर त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य देण्यात आला. यानंतर बैलांची गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सातारा तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी हा विलोभनीय व पारंपरिक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)बळीराजाचंं राज्य येऊ दे...पेट्री : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचा लहरीपणा सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाऊस यावा आणि शेतकऱ्यांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी जावळी तालुक्यातील कास व कुसुंबी येथील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने बेंदूर साजरा केला. बैलाच्या अंगावर रंगरंगोटी ऐवजी ‘बळीराजाचं राज्य येऊ दे’ असा संदेश लिहून आपल दु:ख व भावना व्यक्त केल्या.संदेशातून पर्यावरण जागृतीवृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास ही आपणासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे. यासाठी शासनस्तरावर विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यात शेतकरीही मागे नाहीत. बेंदूर सणाला आपल्या लाडक्या बैलाच्या अंगावर ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश लिहून जावळी तालुक्यातील कुसुंबीमुरा येथील शेतकऱ्याने एक प्रकारे पर्यावरण जागृती केली.