शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संतोषचा गाळा आठ वर्षांपासून बंद

By admin | Updated: August 28, 2016 00:07 IST

शटरच्या आत दडलंय काय? : कसलाही व्यवसाय करायचा नव्हता तर कशासाठी घेतला; धोम ग्रामस्थांना प्रश्न

वाई : संतोष पोळने खून केलेले सहा मृतदेह त्याचे घर किंवा फार्म हाऊसवर पुरले होते, ही धक्कादायक माहिती समोर येत असतानाच संतोष पोळच्या एका गाळ्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. धोम ग्रामपंचायतीचा गाळा त्याने ताब्यात घेतल्यापासून गेली आठ वर्षे बंद आहे. जिल्ह्याबरोबरच राज्यभर वाई हत्याकांड गाजत आहे. मंगल जेधे खून प्रकरणात संतोष पोळ व त्याची प्रेयसी ज्योती मांढरे यांना अटक केली. २००३ पासून त्यांनी केलेल्या पापांची कबुली दिली. एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यांच्या कृत्याची सीमा एवढ्यावर मर्यादित न राहता, त्याने खून केल्यानंतर सहा मृतदेह घर, फार्म हाऊसमध्ये पुरले होते. त्याच्याही पुढे जाऊन त्याने त्यावर झाडे लावली होती. त्यामुळे संतोषबरोबर त्याची स्थावर मालमत्ताही चर्चेत आली आहे. संतोष पोळ हा २००५ ते २०१० या कालावधीत धोम ग्रामपंचायतीत बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आला. या काळात त्याने सदस्यत्वाच्या अधिकाराचा गैरवापर केला. ग्रामस्थांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केली़ त्याने ग्रामपंचायतीद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिले जाणारे गाळ्यापैकी एक गाळा गावातील एका महिलेला मिळाला असताना संतोषने तो गाळा २००८ मध्ये ताब्यात घेतला़ धोम बसथांब्याजवळील संबंधित गाळा गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे़ कोणता व्यवसाय करायचा नव्हता तर गाळा कशासाठी ताब्यात घेतला. अन् घेतला तर तो गाळा त्याने उघडलेला ग्रामस्थांनी कधीही पाहिलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. (प्रतिनिधी) असंख्य कृत्यांना काळी किनार संतोषने ‘ओपीडी’साठी घेतलेली जागा २००६ ते २००९ या काळात त्याच्या ताब्यात होती. जागेचे मालक पोलिस पाटील महादेव पोळ यांनी परत मागितली असता त्याने त्यांच्यावर कोर्टात दावा दाखल केला़ तसेच बेकायदा कब्जा केला़ त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ग्रामस्थांना पडलेला प्रश्न चुकीचे नाही. दरम्यान, ग्रामस्थांशी संपर्क साधला असता आम्ही ग्रामसेवकांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थ संबंधित गाळा उघडणार असल्याचे सांगण्यात आहे, अशी माहिती धोममधील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लवकरच उघडणार गाळा संतोष पोळने वेगवेगळ्या कारनाम्यातून मानवतेला काळिमा फासण्याचे काम केले असून, त्याची संपूर्ण कारकीर्द संशयास्पद आहे़ तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याने २००३ पासून अनेक गंभीर गुन्हे राजरोसपणे केले़ त्याने थंड डोक्याने भयंकर हत्याकांड केल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्हा हादरून गेला़ याच काळात २००८ मध्ये पोळने हा गाळा घेतला होता. गाळा ताब्यात घेतला; पण त्यात कोणताही व्यवसाय सुरू केलेला नाही किंवा दुसऱ्यालाही भाड्याने दिला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या गाळ्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. शंकेचे निरसन करण्यासाठी हा गाळा लवकरच उघडण्यात येणार आहे.