शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘संकल्प’ शाळेचा अभिनव उपक्रम

By admin | Updated: March 26, 2015 00:09 IST

अमित कदम: जिल्हा परिषद; दहा लाखांची तरतूद, दोन कोटींचा निधी लागणार

सातारा : दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणासाठी संकल्प शाळेचा अभिनव उपक्रम सातारा जिल्हा परिषद येत्या वर्षात राबविणार आहे. या उपक्रमासाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित असून, जिल्हा परिषदेने अंदाजपत्रकामध्ये दहा लाखांची तरतूद केली आहे. कृषी पर्यटनासारख्या वेगळ्या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम यांनी सांगितले. अंदाजपत्रकाच्या मंजुरीनंतर पत्रकारांशी बोलताना अमित कदम यांनी ही माहिती दिली. ‘यशवंतराव चव्हाण यांची मार्गदर्शक तत्त्वे समोर ठेवून जिल्हा परिषद काम करत आहे. बहुजन समाजाला केंद्रबिंदू मानून नावीन्यपूर्ण योजना राबविण्यावर आमचा भर राहील. दुर्गम व डोंगराळ भागातील शाळा बंद होत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी बामणोली येथे संकल्प शाळेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ५ किलोमीटर अंतरामधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. वस्तीशाळेच्या धर्तीवर हा उपक्रम राबविला जाईल. ग्रामीण भागातील मुले स्पर्धेत टिकण्यासाठी जे काही दर्जेदार शिक्षण द्यावे लागेल. ते तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून दिले जाईल. या योजनेसाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेने दहा लाखांची तरतूद केली असून, उर्वरित निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळविला जाणार आहे. बामणोली येथील संकल्प शाळेचा उपक्रम यशस्वी झाल्यास रोल मॉडेल म्हणून तो जिल्हाभर राबविला जाईल.’प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक केंद्र शाळांच्या परिसरात सौरदिवे बसविण्यात येणार आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृहासाठीही दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. कृषी साहित्य, औजारे, बी-बियाणे पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. शंभर लाखांच्या तरतूद कृषी विभागासाठी करण्यात आली आहे. अभ्यास दौऱ्यासाठीची तरतूद कमी करून शेतकऱ्यांना आपत्कालीन सहायता निधी देण्यात येणार आहे. थोर पुरुषांच्या पुण्यतिथी व जयंती यासाठी चार लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने नवीन संकल्पना राबविल्या जाणार आहेत. यासाठी २८५.९१ लाखांची तरतूद केली आहे. महिला व समाजकल्याण विभागासाठी १०४.४२ लाखांच्या केलेल्या तरतुदीतून महिलांना घरगुती व्यवसायाच्यानिमित्त नवीन व्यवसाय व व्यावसायिक साधन देणे व महिलांचा आर्थिक विकास व सामाजिक विकास घडवून आणणे. याकरिता निश्चित धोरण आखले जाणार आहे. नवीन अंगणवाड्या विकसित, कुपोषित बालकांचा दर कमी करणे व नवी पिढी सक्षम करण्यासाठीही जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रतापसिंह शेतीशाळेत कृषी पर्यटन केंद्रकृषी पर्यटनाला चालना देऊन व जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी साताऱ्यातील प्रतापसिंह महाराज शेती शाळेत कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. सहकारी संस्था, खासगी संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाईल, हा दिशादर्शक उपक्रम ठरणार आहे. हा जिल्ह्यातला पहिला शासकीय कृषी पर्यटन विकास उपक्रम ठरणार आहे.