शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संजय पाटील खून खटल्याची सुनावणी पूर्ण

By admin | Updated: October 10, 2014 23:02 IST

सातारा : दि. १८ रोजी निकाल लागण्याची शक्यता

सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, शनिवार दि. १८ रोजी या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी वर्तवली आहे. बचाव पक्षाच्या वतीने शुक्रवारी अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. अ‍ॅड. पाटील म्हणाले, ‘या खटल्यातील संशयित उदय पाटील यांनी हे कृत्य करायला कारण काय आहे का, हे समोर आले नाही. सरकार पक्षाने या खून प्रकरणाची दोन कारणे सांगितली आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे, संजय पाटीलने विलासराव पाटील-उंडाळकर यांचा फोटो असलेले घड्याळ फोडून त्यावर पाय दिला. दुसरे कारण बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनेल उभे करू नये, यासाठी उदय पाटील यांनी संजय पाटीलवर दबाव आणला; मात्र खुनाच्या घटनेनंतर फिर्यादी धनंजय पाटीलचे एकूण तीन जबाब घेण्यात आले. त्यामध्ये कुठेही वरील कारण नमूद करण्यात आले नाही,’ अ‍ॅड. पाटील पुढे म्हणाले, ‘दि. २१ जानेवारी २००९ रोजी त्यावेळच्या पोलीस अधीक्षकांना फिर्यादीने निवेदन दिले होते. त्यामध्येही वरीलपैकी खुनाचे कोणतेही कारण दिले नाही. तसेच सरकार पक्षानेही ते शाबीत केले नाही. या खुनाचा जादा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तपासाच्या नावाखाली भूत उभे केले. जादा तपासासाठी अर्ज केला गेला. त्यामध्ये स्पष्ट कारणेही नाहीत. केवळ त्यांनी बोगस कहाणी पुढे आणली. खुनाच्या घटनेनंतर एकूण तीन अधिकाऱ्यांनी याचा तपास केला. त्यामध्ये उदयसिंह पाटील संशयित आरोपी आहेत. हे तिन्ही अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आले नाही. कारण उदय पाटील यांच्याविरोधात कसलेही पुरावे नाहीत, आणि नव्हते. तरीही तांबे यांनी या प्रकरणामध्ये उदय पाटील यांना गोवले. कटाची निश्चित तारीख सरकार पक्षाला सांगता आली नाही. विलासराव पाटील-उंडाळकर हे गेले ३५ वर्षे आमदार आहेत. त्यांची घराणेशाहीचे नेतृत्व उदयसिंह पाटील करतील, त्याचे आत्ताच पाय छाटले तर पुढे फार काही होणार नाही. त्यामुळेच या प्रकरणामध्ये उदयसिंहला नाहक अडकविले आहे. तसेच सध्या विलासराव पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत, याची न्यायालयाने नोंद घ्यावी.’ अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांना अ‍ॅड. ताहेर मणेर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)