शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीवरील पाणी संकट तात्पुरते टळले

By admin | Updated: February 29, 2016 01:01 IST

महापालिकेला दिलासा : महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा; कृष्णा नदीत दोन फूट पाणी आले

सांगली : तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सांगलीच्या कृष्णा नदीत कोयनेतून सोडलेले पाणी पोहोचले. दिवसभरात नदीची पाणीपातळी दोन फुटापर्यंत गेली होती. सांगलीत पाणी पोहोचल्याने शहरावरील पाणी टंचाईचे संकट तात्पुरते टळले आहे. शिवाय पाणी कपातीचा निर्णयही महापालिका प्रशासनाने लांबणीवर टाकला आहे. फेब्रुवारी महिन्यातच सांगलीतील कृष्णा नदी कोरडी पडली होती. नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्याने सांगली व कुपवाड या दोन शहरांवर पाणी संकट दिवसेंदिवस गडद होत चालले होते. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली होती. कोयनेतून दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. पण गेली तीन दिवस हे पाणी सांगलीपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली होती. अखेर रविवारी कोयनेतून सोडलेले पाणी सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचले. दिवसभरात नदीपात्रात दोन फूट पाणी होते. आणखी दोन ते तीन दिवसांत पाणीसाठा वाढणार आहे. तेव्हा सांगली बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाईल. त्यामुळे सध्या नदीपात्रात असलेले दूषित पाणी वाहते होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. सांगलीत कोयनेचे पाणी आल्याने महापालिकेने सुटकेचा नि:श्वास टाकला. आणखी महिनाभर तरी पाण्याची कमतरता भासणार नाही. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी ताळमेळ साधला असून, भविष्यातील पाण्याचेही नियोजन केले आहे. सध्या तरी सांगली व कुपवाड या दोन शहरावरील पाणी टंचाईचे संकट तुर्तास टळले आहे. दरम्यान, नदीपात्रात पाणी पातळी कमी झाल्यानंतर महापालिकेने जॅकवेलच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. दोन दिवसांपासून जॅकवेल व त्याच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे सांगलीच्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले. (प्रतिनिधी) पाईपलाईनचे काम सुरू : सांडपाण्यावर उपायसांगलीत जनावरांच्या बाजारातून नदीकडेने जाणारी मोठी गटार फुटल्याने सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत होते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने बंद पाईपलाईनमधून सांडपाणी नेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार पालिकेने पाईपलाईनचे काम हाती घेतले आहे. पुलापलीकडे शेरीनाल्याची पाईपलाईन सांगली बंधाऱ्यापर्यंत नेण्यात येणार आहे. सुमारे अडीचशे मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यास बंधाऱ्यात सांडपाणी मिसळणार नाही.