शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी भवनावर दगडफेक करणारे संघाचे कार्यकर्ते : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:41 IST

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय हा दुर्दैवी घटना आहे; परंतु या पाठीमागे मोठे ...

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय हा दुर्दैवी घटना आहे; परंतु या पाठीमागे मोठे षड्‌यंत्र सामान्य माणसाला दिसून येत आहे. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयावर ज्यांनी सूडबुद्धीने दगडफेक केली, ते कोणत्या पक्षाशी व ‘संघा’शी संलग्न आहेत, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्चा मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आले? हा कट कुठे शिजला? याची पाळेमुळे पोलीस यंत्रणेने शोधली पाहिजेत. अशा हल्ल्याला मराठा समाज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. म्हणून पोलीस यंत्रणेला अगोदर आम्ही जाब विचारण्यासाठी पोहोचलो आहे. आपल्याला खूप मोठी शाबासकी मिळेल, या भ्रमात संबंधितांनी राहू नये. आम्ही जशास तसे उत्तम प्रकारे उत्तर देऊ शकतो, असा मार्मिक इशाराही आ. शिंदे यांनी दिला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल, त्याबाबत राज्य सरकारला श्रेय किंवा दोष देता येणार नाही. सध्या आरक्षण निकालाने त्यांची भूमिका ही मराठा समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणारी प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बहुजन व मराठा समाजाबद्दल आकस असल्याने त्यांनी अनेक मराठा समाजातील नेतृत्व आपल्या बाजूला ओढून घेतले आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे माजी मुख्यमंत्री उभे राहिले. अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कमी करण्यासाठी कधी ईडी, सी.बी.आय., गुप्तचर विभाग, फोन टॅपिंगचे प्रकार मागे लावले, तरी तेवढी ताकद मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे लावली नाही, ३७० कलम रद्द करणे, तलाक पद्धत रद्द करणे, नोटाबंदी, लॉकडाऊनचे निर्णय पटकन घेतले जातात. मग मराठा आरक्षणाचा निर्णयसुद्धा ते घेऊ शकत होते; पण त्यांनी ते केले नाही, ते झाले असते तर केंद्राने केले, असे सांगून नेहमीप्रमाणे दिशाभूल केली असती, असाही आरोप आ. शशिकांतजी शिंदे यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, गोरखनाथ नलावडे, मंगेश ढाणे, शुभम साळुंखे, पै नीलेश पाटील, पारिजात दळवी, सनी शिर्के, अजित बर्गे, सागर पवार, वरद फडतरे, कामेश कांबळे, मल्लेश मुलगे व मराठा युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.