शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

संगमनगर धक्का पूल पाण्याखालीच

By admin | Updated: September 11, 2014 00:09 IST

धोम, कण्हेरमधून विसर्ग : ३५ गावे अजूनही संपर्कहीन

सातारा : जिल्ह्याच्या धरण पाणलोट क्षेत्रांत संततधार सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. बहुतांशी धरणे भरण्याच्या मार्गावर असून, धोम-बलकवडी, वीर, भाटघर, नीरा-देवघर ही धरणे पूर्ण भरली आहेत. कोयना धरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजता १०४.८२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरणातील पाण्याचा येवा २४,२५९ क्युसेक इतका असून, संगमनगर धक्का पूल अजूनही पाण्याखाली आहे. कण्हेर धरणातून दुपारी पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. कण्हेर पाणलोट क्षेत्रांत जोरदार सरी कोसळत असल्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहेत. कण्हेर धरणाची पाणीसाठवण क्षमता १०.१० टीएमसी इतकी असून, धरणात ९.१८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी बारा वाजता धरणातून ४१५० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. परिणामी जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन विभागाने वेण्णा नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार असल्यामुळे धरणातील पाण्याचा येवा २४,२५९ क्युसेक इतका असून, संगमनगर धक्का पूल अजूनही पाण्याखाली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ इतकी असून, आजमितीस असणारा पाणीसाठा १०४.८२ टीएमसी इतका आहे. पाणीपातळी २१६३.२ फूट इतकी असून, धरणातून १४,१३४ तर पायथा वीजगृहातून २१११ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे. दरम्यान, कोयनानगर येथे दिवसभरात २० (४६५५), नवजा ५ (५५२३) तर महाबळेश्वर येथे १६ (४४९६) मिमी पावसाची नोंद झाली आहे.वीर, भाटघर, नीरा-देवघर आणि धोम-बलकवडी ही धरणे पूर्ण भरली आहेत. या धरणातून नदीपात्रात विसर्ग होत आहे. दरम्यान, उरमोडी धरणातून ३०० क्युसेक, वीर १५३११, धोम ३२८१, धोम-बलकवडी १९५३ तर महू धरणातून १३२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी सर्वाधिक ७६ मिमी पावसाची नोंद महाबळेवर तालुक्यात झाली असून, जिल्ह्यात बुधवारी पहाटे आणि मंगळवारी दिवसभरात ११६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आत्तापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी अशी, कंसात एकूण पाऊस : सातारा ८.८ (९५८.४), जावळी १४ (१५०२.५), कोरेगाव १.१ (४११.६), कऱ्हाड २.३ (५६५.९), पाटण ९ (१३८१.५), फलटण १.१ (२६७.७), खटाव ०.५ (४३८.७), वाई २.५ (५६०.८) मिमी, खंडाळा ०.९ (४०६.७) आणि महाबळेश्वर ७६ (५४४५.२) मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी १०.६ मिमी पाऊस झाला असून, आजअखेर झालेल्या पावसाची नोंद १२२४१.६ मिमी इतकी आहे. तालुकानिहाय सरासरी १११२.९ मिमी इतकी आहे. (प्रतिनिधी)