शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सालपेत वृद्धेचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:12 IST

लोणंद/आदर्की : पहाटे लघु-शंकेसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धेवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. संबंधित वृद्धेच्या ...

लोणंद/आदर्की : पहाटे लघु-शंकेसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धेवर अज्ञाताने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.संबंधित वृद्धेच्या अंगावरील दागिने लंपास झाले असल्याने चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ही खळबळजनक घटना फलटण तालुक्यातील सालपे येथे सोमवारी घडली. शांताबाई जयवंत खरात (वय ७०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शांताबाई खरात या सोमवारी पहाटे चारच्या सुमारास लघुशंकेसाठी घराच्या बाहेर गेल्या होत्या.पंधरा मिनिटे होऊनही त्या घरात न आल्याने त्यांचे पती जयवंत खरात हे बाहेर गेले. तेव्हा त्यांना शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. जयवंत यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा संतोष बाहेर आले असता त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांना तातडीने उपचारासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्रात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पाठीवर डाव्या बाजूला धारदार शस्त्राने दोन वार केले होते. तसेच त्यांच्या गळ्यातील पोत गायब होती. चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीने खून केला असावा, अशी शक्यता संतोष जयवंत खरात यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित दिली.घटनेची माहिती मिळताच लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. मात्र श्वानही घराच्या आसपास घुटमळले. घटनास्थळी उपविभगीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी भेट दिली.