शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यावसायिक जेलभरो आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

सातारा : लॉकडाऊनमधून सलून व पार्लर व्यवसाय वगळून येत्या तीन दिवसात परवानगी दिली नाही तर १२ एप्रिलपासून सर्व सलून ...

सातारा : लॉकडाऊनमधून सलून व पार्लर व्यवसाय वगळून येत्या तीन दिवसात परवानगी दिली नाही तर १२ एप्रिलपासून सर्व सलून व्यवसाय सुरू केले जातील. प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतली तर व्यावसायिकांसाठी रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला आहे.

गायकवाड यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने प्रत्येक कारागिराला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पंधरा ते वीस हजार रुपये प्रति महिना द्यावेत, शासनाने सर्व व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्याचा आदेश काढला मात्र अद्याप कारागिरांना लस दिली नाही. वयाचा निकष न लावता सर्व सलूनमधील कारागिरांना तातडीने लस द्यावी तसेच सलून व पार्लर व्यवसाय लाॅकडाऊनमधून वगळून येत्या तीन ते चार दिवसात शासनाने हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. या मागण्यांची दखल घेतली नाही तर १३ एप्रिलपासून राज्यातील सर्व व्यवसाय सुरू केले जातील. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यास नाभिक व्यावसायिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. त्याला संपूर्णपणे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे. याविषयीचे निवेदन राज्य सरचिटणीस मंगेश काशीद, जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, पांडुरंग चव्हाण, राज्य सदस्य रामभाऊ पवार, तालुकाध्यक्ष जगन्नाथ पवार, प्रताप भोसले, चंद्रकांत सकपाळ, संकेत निकम, तानाजी काशीद, प्रशांत जाधव आदींनी दिले.