शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती मांढरेच्या मागे आता सलमा शेख प्रकरण

By admin | Updated: August 26, 2016 23:17 IST

सात दिवस पोलिस कोठडी : ज्योतीच्या मोबाईलचाही लागेना सुगावा

वाई : मंगल जेधे खून प्रकरणात अटकेत असलेल्या ज्योती मांढरेच्या मागे आता सलमा शेख खून प्रकरण लागले आहे. ज्योती मांढरेचा मोबाईल सापडत नाही तसेच तिला सलमा शेख खुनाचा तपास करण्यासाठी शुक्रवारी वाई न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यात तिला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याची मुदत १ सप्टेंबरला संपत आहे, तर संतोष पोळला न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगल जेधे खून प्रकरणातील ज्योतीच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी तिला न्यायालयीन कोठडी दिली होती. पोलिसांनी पुन्हा तिला सातारा येथील कारागृहात वर्ग करून तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी तिला शुक्रवारी न्यायालयासमोर उभे करून सलमा शेख खून प्रकरणात सात दिवसांची पोलिस कोठडी मिळविली आहे. (प्रतिनिधी)भारती कोरवार यांनी घेतलं संतोषचं वकीलपत्रसंतोष पोळ आणि ज्योती मांढरे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, त्यामुळे कोणीतरी त्यांचे वकीलपत्र घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, वकील संघटनेने संतोष पोळ व ज्योती मांढरे यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा युक्तिवाद तो न्यायालयात करू शकतो म्हणून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून अ‍ॅड. भारती कोरवार यांनी शुक्रवारी न्यायालयात वकीलपत्र दाखल केले. अ‍ॅड. भारती कोरवार या संतोष पोळची बाजू मांडणार आहेत. त्या विधी सेवा समितीच्या सदस्या आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून भारती कोरवार संतोषची बाजू मांडणार आहेत.संतोषला आज न्यायालयात हजर करणारसंतोष पोळलाही साताऱ्यातील कारागृहात वर्ग करून त्याला पुन्हा सलमा शेख खून प्रकरणात शनिवारी न्यायालयासमोर हजार करण्यात येणार आहे. त्याचीही पोलिस कोठडी मिळविण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत.