शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे... दादा दहा रुपयांचा ठोकळा बंद झाला

By admin | Updated: May 28, 2017 14:30 IST

अफवांचं पिक : रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणानंतरही तरडगावच्या बाजारातून नाणे हद्दपारीच्या मार्गावर

आॅनलाईन लोकमत

तरडगाव : ह्दादा... दहा रुपयाचा ठोकळा बंद झाला ठाऊक नाय व्हय.. दुसरी नोट द्या, असा संवाद तरडगाव परिसरातील आठवडा बाजारांतून ऐकायला मिळत आहे. दहा रुपयांची नाणी वागवणे अवघड जात असल्याने काही व्यापाऱ्यांकडून हेतू पुरस्करपणे अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दहा रुपयांची नाणी बंद होणार या अफवांमुळे सर्वसामान्यामध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. जवळील पाच, दहा रुपयांची नाणी जमा करण्यासाठी नागरिकांनी चक्क बँकांकडे धाव घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान अधिकृत चलन नाकारणे हा गुन्हा असून तसे आढळल्यास आखील भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला गेल्याने दिलासा मिळाला असला तरी जवळ दहा रुपयांचे नाणे बाळगणे जिकिरीचे बनत असल्याचे दैनंदिन वेगवेगळ्या होणाऱ्या घडामोडीतून भासत आहे.

नागरिक व काही व्यापारीही नोटबंदीच्या काळाप्रमाणे उगाचच भविष्यात बँकेत रांगा लावण्याची वेळ येऊ नये या भीतीपोटी दहा रुपयाचे नाणे दिसले की हात झटकत आहे. आठवडा बाजारातही काही विक्रेते अशी नाणी स्वीकारत नसल्याने बाजारकरूची गैरसोय होते. एरव्ही पिग्मी एजंटांकडून सुटे पैसे घेणारे व्यापारी आता एजंट दैनंदिनी रक्कम नेण्यासाठी दुकानात आला की त्याच्या हातावर सुटे पैसे ठेवताना दिसत आहेत. नाणे बंदीच्या अफवेमुळे दहा रुपयाचे नाणे जवळ बाळगण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसत आहे.

रोजच्या नाण्याच्या संदर्भात होणाऱ्या घडामोडीमुळे शेवटी नागरिकांनी पाच, दहा रुपयांची नाणी आता थेट बॅँकेतच भरण्याचा पर्याय निवडल्याचे सद्य:स्थितीवरून समजते. त्यानुसार ही मंडळी आता बचत म्हणून ठेवलेली ही नाणी जमा करण्यासाठी बँकेकडे धाव घेऊ लागली आहेत.

याचा प्रत्यय नुकताच महाराष्ट्र बँकेच्या तरडगाव येथील शाखेत आला. घरात बचत म्हणून जमा करून ठेवलेली पाच व दहा रुपयांची नाणी बॅँकेत भरण्यासाठी आणणारी वृद्ध व्यक्ती संबंधित नाणी बॅँकेतच मोजत असल्याचे पाहून अफवांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत उपस्थितांमधून उलटसुलट चर्चा सुरू झाली. इतर दोन व्यक्तींनी त्या वृद्ध व्यक्तिकडून पाच रुपयांची काही सुटी नाणी घेऊन त्या बदल्यात नोटा देवून वृद्धाकडील चलनातील नाण्यांचा भार कमी केला.नाणी न स्वीकारणे गुन्हा असून ती सर्वांनी दैनंदिन व्यवहारात वापरावीत असे आवाहन केले जाते. तरीही अफवांमुळे ती आता बँकेत येण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकाकडून स्वीकारल्यावर बँक कॅशिअर ती मोजताना खूप वेळ जात आहे. यामुळे इतर ग्राहकांना ताठखळत थांबावे लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होतो. यासाठी सद्यस्थितीत दहा रुपयांच्या नाण्याचं चलन सर्वांनी स्वीकारून व्यवहारात खेळत रहाणं हे सर्वांसाठी फायद्याचं ठरेल