शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:48 IST

दीपक शिंदे वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील ...

दीपक शिंदेवैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा महत्त्वाची, असे मनाशी पक्के ठरवत सातारा लोकसभा मतदार संघातून १९६२ मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले क्रांतिवीर किसन वीर यांनी आपला मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांच्यासाठी सोडला. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते; पण चीन आणि पाकिस्तान युद्धामुळे देशाला एका भक्कम संरक्षणमंत्र्यांची गरज होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला, अशा प्रकारचे कौतुकही झाले; पण १९६७ मध्ये त्यांना पुन्हा दिल्लीला जाण्यासाठी मतदारसंघ नव्हता.राज्यात पुन्हा थांबणे योग्य नव्हते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी नाशिकमधून लढण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत किसन वीर यांना कळाल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना सातारा मतदार संघातूनच उभे राहण्यासाठी विनंती केली. त्यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी किसन वीर यांनी स्वत:वर घेतली. त्यामुळे १९६७ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून यशवंतराव चव्हाण निवडून आले. त्यावेळी कºहाडमधून आनंदराव चव्हाण हे काँग्रेसकडून निवडणूक लढत होते. त्यांना अडचण निर्माण करण्याची यशवंतराव चव्हाण यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी अखेर सातारा मतदार संघातूनच निवडणूक लढविली आणि सुमारे १ लाख २७ हजार ८३६ मतांनी जिंकली.यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ नंतर १९७१, १९७७, १९८० असे चार वेळा सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यामुळे देशात सातारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात संरक्षणमंत्री, अर्थ व नियोजन, गृहमंत्री त्याबरोबरच परराष्ट्रमंत्री अशी खाती त्यांनी सांभाळली. यशवंतराव चव्हाणांनी राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही गोष्टी अत्यंत जबाबदारीने सांभाळल्या. सहकार आणि कृषी यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. राज्य आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने सातारा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, ही या मतदारसंघ आणि सातारकरांच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब आहे.