शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकनेत्याच्या निधनाने सातार्‍यात दुखवटा

By admin | Updated: June 4, 2014 23:59 IST

उत्स्फूर्त बंद : सातारा शहरात सर्वपक्षीय शोकसभेला मान्यवरांची उपस्थिती

सातारा : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे सातार्‍यात दुखवटा पाळण्यात आला. मंगळवारी दिवसभर व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली. तसेच विविध ठिकाणी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. यांनी आधारस्तंभ हरपला असल्याची भावना विविध राजकीय कार्यकर्त्यांनी सातार्‍यात व्यक्त केली. मुंडे यांना सातारा शहरात जागोजागी श्रध्दांजली वाहण्यात आली. येथील मोती चौकात आयोजित शोकसभेत शिवसेनेचे नरेंद्र पाटील म्हणाले, ‘कासचे पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे सातार्‍यात आणण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे पूर्ण झाले. खासदार उदयनराजे भोसले यांची राजकीय वाटचाल गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच फलरुप होऊ शकली.’ पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शहरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशीही मुंडे यांचे ऋणानुबंध होते, असे त्यांनी सांगितले. भाजपाच्या शहराध्यक्षा सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘मुंडेच्या रुपाने महाराष्ट्रातील मोठा आधारस्तंभ गळून पडला आहे.’ जावळी विकास आघाडीचे दीपक पवार यांनी गोपीनाथ मुडे यांच्या जाण्याने पक्षात एक राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे तसेच त्यांच्या सारखा जनसामान्यात वावरणारा नेता परत होऊ शकत नाही, अशी भावना व्यक्त केली. सर्व जाती जमातीतील तरुणांना आकर्षित करणारा त्याचबरोबर राजकीय मतभेद विसरुन सर्वांना मदत आणि मार्गदर्शन करणारा जनसामान्यांचा नेता आता आपल्यातून दूर गेला आहे, अशी खंत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर यांनी व्यक्त केली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव गवळी, अजय परदेशी, म्हसवडचे डॉ. महादेव कापसे, चंद्रकांत घोरपडे, पूर्वाश्रमीचे भाजपाचे नगरसेवक विजय नाफड, व्यापारी संघटनेचे गोपाळशेठ गुजर, सुजाता कोल्हटकर, जयदीप ठुसे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र सावरणे महाकठीण : तपासे ‘मुंडे यांच्या जाण्याने देशातील बहुजन चळवळीचे नुकसान झालेच पण महाराष्ट्रातील महायुतीच्या साखळीची कडी निखळून पडली आहे. यातून सावरणे महाकठीण आहे,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाच्यावतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांनी श्रध्दांजली वाहिली. पालिकेतर्फे मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी अभिजित बापट, लेखापाल हेमंत जाधव, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, अविनाश कदम, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, विजय बडेकर, संदीप साखरे, भाग्यवंत कुंभार, नगरसेविका सुवर्णा पाटील, मनिषा भणगे, हेमांगी जोशी, हेमा तपासे, श्रीकांत आंबेकर, राम हादगे उपस्थित हाते. सातारा जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने श्रध्दांजली बैठकीत ते बोलत होते. रिपाइंच्या भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, अल्पसंख्यांक आघाडीचे फारुखभाई पटणी, आण्णा उबाळे, महेंद्र गायकवाड, अजित जगताप, मिलिंद कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)