शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून मजुराचा निर्घृण खून

By admin | Updated: October 14, 2016 00:30 IST

‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलले : कऱ्हाड पोलिसांकडून कसून तपास

कऱ्हाड : येथील ईदगाह मैदानाजवळ बुधवारी रात्री मजुराचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. संबंधित मजुराचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याचा बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याचे गुरुवारी शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. खुनाचे कारण आणि मारेकरी यांच्याविषयी पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असून, पोलिस कसून चौकशी करीत आहेत. सन्मुख बसू कोळी (वय ४५, रा. रत्नागिरी गोदामजवळ, कऱ्हाड. मूळ रा. जंबगी, जि. विजापूर) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत मृत सन्मुखची पत्नी मालम्मा कोळी हिने कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील जंबगी येथील सन्मुख कोळी हा सुमारे तीन वर्षांपूर्वी मजुरीनिमित्त कऱ्हाडात आला होता. त्यानंतर येथेच तो स्थायिक झाला. पत्नी व सहा मुलांसह तो शहरातील रत्नागिरी गोदामनजीक भाडेतत्त्वावरील खोलीत राहायचा. सन्मुख व त्याची पत्नी मालम्मा हे दोघेही मजुरीने खड्डे काढण्यासाठी जात होते. दि. ११ आॅक्टोबर रोजी रात्री सन्मुख काही कामानिमित्त घरातून बाहेर पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. अशातच बुधवारी सायंकाळी शहरातील ईदगाह मैदान परिसरात निर्जनस्थळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, जोतिराम गुंजवटे हे अधिकाऱ्यांसह त्याठिकाणी आले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. तसेच त्याच्याजवळील वस्तूही ताब्यात घेतल्या. त्यानंतर चौकशी केली असता तो मृतदेह ान्मुख कोळी याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर सन्मुखचे नातेवाईक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ओळखला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. प्रथमदर्शनी सन्मुखच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. मात्र, गंभीर दुखापत नसल्याने त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्टपणे सांगता येत नव्हते. अखेर शवविच्छेदनातून सन्मुखच्या मृत्यूचे कारण समोर आले. त्याच्या डोक्यावर, कानावर तसेच छातीवर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून, मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी पत्नी मालम्मा हिच्या फिर्यादीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. घटनेबाबत पोलिसांकडून सध्या सखोल तपास केला जात आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असल्याचे समजते. संशयित सापडल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे तपास करीत आहेत.