शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘बेलएअर’ चालविणार ग्रामीण रुग्णालय --आरोग्य मंत्र्यांचा निर्णय

By admin | Updated: June 4, 2016 00:38 IST

प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना; मकरंद पाटील यांच्यासह पालिका शिष्टमंडळाची आरोग्य मंत्र्यांशी चर्चा--महाबळेश्वर सलाईनवर -तीन

अजित जाधव -- महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाची अनेक वर्षांपासून सुरू असलेली हेळसांड थांबावी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात याव्या यासाठी हे रुग्णालय पाचगणीच्या ‘बेलएअर’ रुग्णालयास प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी चालविण्यास देण्यात यावे, असा निर्णय घेतला राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयावर अजून अंमलबजावणी झालेली नाही. महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात २७ पैकी केवळ १३ कर्मचारी कार्यरत असून, १३ हजार ४०० इतकी लोकसंख्या असलेल्या या शहराला केवळ १३ कर्मचाऱ्यांकडून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. अनेक वर्षांपासून या रुग्णालयाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासर्वांमध्ये सामान्य नागरिक भरडला जात आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून व रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण सोडविण्यासाठी महाबळेश्वर पालिकेच्या वतीने शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली, नगरसेवक कुमार शिंदे व बेलएअर रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी या समस्येबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे रुग्णालयातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेनंतर हे रुग्णालय पालिकेकडे हस्तांतरीत करण्याऐवजी बेलएअर रुग्णालयास एक वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला. बेलएअर रुग्णालयास याबाबतचा प्रस्ताव तत्काळ देण्यात यावा, अशा सूचना मंत्री सावंत यांनी केल्या. मात्र, दोन महिने झाले तरी या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. पालिका प्रशासनाकडून याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (समाप्त)बेलएअर रुग्णालयच का ?पाचगणीचे बेलएअर रुग्णालय हे इंडियन रेडक्रॉस सोसायटीशी संलग्न असून, त्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे राज्यपाल असतात. तसेच पदसिद्ध सचिव हे राज्याचे आरोग्यमंत्री असतात. बेलएअर रुग्णालयामार्फत महाबळेश्वरचे ग्रामीण रुग्णालय प्रायोगिक तत्त्वावर का होईना चालविण्यास घेतल्यानंतर यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. या रुग्णालयावर व कामाकाजावर शासनाचे पूर्णपणे लक्ष राहील. आरोग्य मंत्र्यांनी बेलएअर रुग्णालयास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या आठ दिवसांत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. महाबळेश्वरकडे केवळ थंड हवेचे ठिकाणी म्हणून न पाहता शासनाने स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. पालिका यासाठी आपल्या परिणे नेहमीच प्रयत्न करते.- कुमार शिंदे, नगरसेवक (महाबळेश्वर, न. पा)महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या समस्येबाबत आ. मकरंद पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नगरसेवक कुमार शिंदे, बेलएअर रुग्णालयाचे प्रतिनिधी बाबर व अधिकारी उपस्थित होते.