नागठाणे : सातारा तालुक्यातील अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागठाणे, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. रूपाली सुजित बेंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदी अनिल पांडुरंग साळुंखे यांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (महिला) राखीव आहे. येथील ग्रामपंचायतीवर अजिंक्य ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. सोमवारी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम नागठाणे येथील सभागृहात पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एन. गावडे यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन पवार यांनी काम पाहिले. यावेळी सरपंचपदी डॉ. रूपाली बेंद्रे व उपसरपंचपदी अनिल साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली.
अजिंक्य पॅनलचे प्रमुख व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण साळुंखे, सातारा खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष नारायण साळुंखे, मारुती जेधे तसेच ग्रामस्थांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
फोटो : ०९ नागठाणे
नागठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डाॅ. रूपाली बेंद्रे, तर उपसरपंचपदी अनिल साळुंखे यांची निवड करण्यात आली.