शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

धावडशीच्या जवानाची आत्महत्या

By admin | Updated: November 26, 2015 00:05 IST

कारण अस्पष्ट : अभिजित पवार यांच्या जाण्याने गावावर शोककळा

किडगाव : सातारा तालुक्यातील धावडशी गावचे मूळ रहिवासी असलेले लष्करी जवान अभिजित दिलीप पवार (वय २४) यांनी सोमवारी (दि. २३) रात्री आसामात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र त्यांच्या आकस्मिक जाण्याने धावडशी गावावर शोककळा पसरली आहे.अभिजित पवार हे ‘आसाम रायफल्स’मध्ये कार्यरत होते. २०१० मध्ये ते लष्करी सेवेत भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धावडशी येथेच झाले. साताऱ्याच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात कला शाखेत त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले होते. अभिजित यांचे वडील दिलीप पवार शेती करतात, तर आई सुरेखा या त्यांना मदत करतात. अभिजित यांना अश्विनी आणि अमृता अशा दोन विवाहित बहिणी असून, अमृता यांच्या विवाहावेळी जून महिन्यात अभिजित गावी येऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या आजीचे निधन आॅगस्ट महिन्यात झाले, तेव्हा ते एक महिन्याची सुटी घेऊन गावी आले होते. गेल्या सोमवारी (दि. १६) त्यांचे आजोबा आनंदराव पवार यांचे निधन झाले; मात्र त्यावेळी रजा न मिळाल्याने अभिजित गावी येऊ शकले नाहीत. अभिजित हे आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. मनमिळावू स्वभावामुळे ते गावात लोकप्रिय होते. (वार्ताहर)