शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावचा राजमा दराअभावी पुन्हा धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 14:57 IST

देशाच्या राजधानीत राजमा या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही ? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे.

ठळक मुद्देदराअभावी शेतकºयांपुढे संकट पुढीलवर्षी पिकवायचा की नाहीचा प्रश्न उभा भांडवलदारांच्या स्पर्धेत टिकाव लागणं अशक्य...कोरेगावतील घेवडा दिल्ली बाजारी राजमा

वाठार स्टेशन : देशाच्या राजधानीत राजमा या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही ? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे.

कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत इथला शेतकरी कायम दुष्काळी संकटाचा सामना करत आला आहे. घेवडा पिकासाठी लागणारे पोषक वातावरण या भागात असल्याने हा भाग घेवडा उत्पादनात अग्रणी मानला जातो. तसेच या पिकावर या भागातील अनेक शेतकºयांचे वर्षाचे अर्थचक्र अवलंबून आहे. मात्र, या पिकाचा समावेश पीक विम्यात नसल्याने तसेच या पिकास कोणताही हमीभाव नसल्याने या पिकाची दिल्ली दरबारी कायम निराशा राहिली आहे.

 कोरेगावतल्या शेतकºयांची दिवाळी राजम्याच्या दर आणि उत्पादनावर अवलंबून असते. मात्र, यंदाचा घेवड्याचा दर पाहिला तर कापूस, कांदा उत्पादन करणाºया शेतकºयांची अवस्था झाली आहे. यापेक्षा बिकट अवस्था घेवडा उत्पादन करणाºया शेतकºयांची झाली आहे.

कोरेगावातला घेवडा दिल्ली बाजारी राजमा नावाने विकला जात असला तरी परदेशातून केलेल्या आयातीच्या प्रमाणावर घेवड्याचा दर निश्चित होत असतो. गेल्या काही वर्षात रुपयाचे जागतिक मुल्य कमी झाल्यामुळे आयातीवर प्रतिकूल परिणाम होऊन घेवड्याची आयात कमी झाली. परिणामी घेवड्याचा भाव वधारला होता. यंदा मात्र पावसाने अगोदरच पाठ फिरवली आहे. पर्यायाने घेवड्याचं उत्पन्न कमी होऊन सुद्धा दर मात्र गेल्यावर्षीपेक्षा फारच कमी आहेत. टिकाव लागणं अशक्य...शेतकºयांना थेट दिल्लीचा दर मिळावा म्हणून देऊर येथील एका सामाजिक संस्थेने राजम्याचं पेटंट देखील मिळविलं होतं. पण, प्रचंड भांडवल आणि भांडवलदारांच्या स्पर्धेत कोणाचाच टिकाव लागणं शक्य नाही. त्यामुळे पर्यायाने शेतकरी हतबल होऊन व्यापारी घेईल त्याच दराने घेवडा विकताना दिसत आहे.  अशापद्धतीन संकटांचा सामना करणाºया कोरेगावच्या शेतकºयांपुढे पुढीलवर्षी राजमा करायचा की नाही हाच एक प्रश्न उभा ठाकला आहे.