शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

ढासळत्या किल्ल्यावरच्या बुलंद बुरुजांनो!

By admin | Updated: October 16, 2014 22:50 IST

सातारा-कोरेगाव : शेवटी-शेवटी दौडले वीर दोन---सातारनामा

‘महाराष्ट्रात कसलाही राजकीय भूकंप होेऊ दे; पण साताऱ्याला कधीच धक्का बसत नसतो!’ हे जिथं विरोधकच मोठ्या कौतुकानं सांगतात, तिथं ‘इथला निकाल काय लागणार?’ हे स्पष्ट करण्याची गरज आम्हा पामरांना नक्कीच नसावी. मात्र, सुरूवातीला एकतर्फी वाटणाऱ्या साताऱ्याच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात मात्र ‘डी’ गॅँॅँगनं भलतंच पळवलं. (‘डी’ म्हणजे ‘दोन दीपक अन् एक दगडू’ हो ऽऽ.) ‘एक लाखाच्या खाली लीड घ्यायचा नाही बरं का...’ अशी भाषणं ठोकणारे कार्यकर्तेही शेवटी-शेवटी ‘प्रत्येक मत महत्त्वाचं’ म्हणू लागले. जावळीतल्या दीपकच्या कुरघोड्या जेवढ्या बाबाराजेंसाठी त्रासदायक ठरत होत्या, तेवढाच ‘कांगा कॉलनीतला कांगावा’ही चिंता वाढविणारा होता.‘बाबाराजेंचा लोकाधार’ या मुद्यावर दगडूभाऊंनी रान उठविलं. शेवटच्या टप्प्यात तर ‘खरे छत्रपती केवळ उदयनराजेच!’ अशी घोषणा करुन त्यांच्या ‘राज’पणाबद्दल भलताच प्रश्न उभा करुन ठेवला. खरंतर, शिवेंद्रसिंहराजे सक्षम लोकप्रतिनिधी आहेत की नाही, यावर चर्चा करायला हरकत नव्हती. परंतु त्यांच्या ‘छत्रपती’पदाबद्दल जनतेत विनाकारण संभ्रम निर्माण करुन सकपाळांनी काय साधलं, हे त्यांनाच ठावूक. असो, यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाबाराजेंना दोन गोष्टींची ‘दिवाळी भेट’ दिली. एक म्हणजे, पाटलांच्या नरेंद्रना शेजारच्या मैदानात पाठवून नेहमीची डोकेदुखी कमी केली... पण दुसरीकडं मुंबईच्या दगडूभाऊंना पुन्हा साताऱ्यात पाठवून ‘झंडूबाम’ कपाटातून काढायला लावला. थोडक्यात, ‘पाटलांचं आऊटगोर्इंग छान’ वाटलं. पण ‘सकपाळांचं इनकमिंग महाग’ पडलं! गरज नसतानाही म्हणे शेवटी-शेवटी खर्च करावा लागला. हिशेबाचा मेळ घालता घालता वहिनींचाही वेळ म्हणे बराच गेला.लोकसभेच्या काळात केलेला ‘सातारा क्लब करार’ उदयनराजेंनी यंदा विधानसभेत पाळला. त्यांचे कार्यकर्तेही बाबांसाठी पळाले. ‘होयऽऽ... उदयनराजे बाबांचेच !’ यावर अनेकांचा निवडणुकीपुरता का होईना, विश्वास बसला. (यात कऱ्हाडच्या राजेंद्रबाबा प्रकरणाचा संबंध नाही; कारण ‘साताऱ्याचे बाबा’ अन् ‘कऱ्हाडचे पृथ्वीबाबा’ यांच्यात खूप फरक!) कोरेगावात मात्र ल्हासुर्णेच्या शिंदेंना उदयनराजेंसाठी जोरात फिल्डिंग लावावी लागली. सातारा तालुक्यातला ‘हायवे पट्टा ’ तसा पूर्णपणे उदयनराजेंच्याच ऐकण्यातला. अशातच काँग्रेसचे विजयराव सोनगावच्या फार्महाऊसवर राजेंना गुपचूप भेटायला गेलेले. हे समजताच शिंदेंनी थेट ‘जलमंदिर’ गाठलं. राजमातांची कोरेगावात जंगी सभा लावली. ‘शिंदे हे माझे उदयनराजेच !’ अशी भावनिक घोषणाही कल्पनाराजेंनी केली. त्यानंतर थेट कणसेंच्या अंगापुरात घुसून तिथं त्यांनी दोन्ही राजेंची मोठ्ठी सभा घेतली. इथंच ‘कॉँग्रेसचा विजय’ राजेंच्या हातातून सुटला. ‘कधी कुठं अन् कुणाची नस कशी दाबायची,’ यात माहीर असणाऱ्या शिंदेंनी सातारा तालुक्याचं माप अखेर स्वत:च्या पदरात पाडून घेतलेलं. कारण, कोणताही ‘रिस्क फॅक्टर’ न स्वीकारण्याची तयारी यंदा शिंदेंनी केलेली. खरंतर, कोरेगावातही सुरूवातीला साताऱ्यासारखीच ‘शांत-निवांत’ परिस्थिती होती. इथले विरोधक नेहमीप्रमाणं ‘टोपल्यातल्या खेकड्यांचा खेळ’ बघण्यात दंग झाले होते. ‘यंदा आपल्यासमोर कुणीही तगडा उमेदवार नाही’ अशा भ्रमात राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते होते. तरीही शिंदेंना शेवटच्या टप्यात खूप दमछाक करावी लागली.‘साम-दाम-दंड-भेद’मध्ये शिंदे भलेही यंदा यशस्वी झाले असतील; मात्र पाच वर्षानंतरही ‘उपरेपणाच्या शिक्का’ काही त्यांना पूर्णपणे पुसता न आलेला. असो, ‘राज्यात घड्याळाचं साम्राज्य खालसा होणार की नाही,’ हा ‘एक्झिट पोल’वाल्यांचा विषय... मात्र जिल्ह्यातले ‘सातारा अन् कोरेगाव’चे बुरुज नक्कीच टिकणार, हा इथल्या कार्यकर्त्यांचा विश्वास. अशीच थोडीफार परिस्थिती शेजारच्या ‘वाई अन् फलटण’मध्येही; पण या दोन बुरुजावरची टेहळणी उद्याच्या अंकात!सातारा : मतदानाची वेळ संपली. ‘एक्झिट पोल’नं तुतारी फुंकली, ‘भाजप सत्तेवर येणार’चा ढोल वाजवला गेला तर राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी पुरता ‘बॅन्डबाजा’ दिसू लागला. चार खासदार ‘कार’मध्ये बसू शकले होते; पण आता आमदारही ‘मिनीबस’मध्ये बसले जाण्याची चर्चा जोरात सुरू. हे धक्कादायक आकडे पाहून साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांचे विस्फारलेत डोळे... बारामतीतल्या ‘दादांचं राज्य’ राहू दे बाजूला; इथल्या सातारी ‘सरदारांचा किल्ला’ कसा शाबूत राहतोय, याकडं लागलंय सर्वांचं लक्ष !