शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

नामांतर होऊनही योजनेला मुडदूस--आपले सरकार सेवा केंद्रांचाचा परकेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:40 IST

ढेबेवाडी : एकविसाव्या शतकात आधुनिक महाराष्ट्रातील ‘मिनी मंत्रालय’ तथा ग्रामपंचायतींचा कारभार जलद आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘संग्राम’ योजना जन्माला आली. या योजनेचे नामांतर

रवींद्र माने।ढेबेवाडी : एकविसाव्या शतकात आधुनिक महाराष्ट्रातील ‘मिनी मंत्रालय’ तथा ग्रामपंचायतींचा कारभार जलद आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘संग्राम’ योजना जन्माला आली. या योजनेचे नामांतर करून उदयास आलेले ‘आपले सेवा सरकार’ योजनेलाच ‘मुडदूस’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तत्कालीन आघाडी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळावी व माहिती तंत्रज्ञानाने समृद्ध बनवितावे यावे म्हणून निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाचा गळा घोटून स्वत:ची तुंबडी भरण्याचे काम संबंधीत ठेकेदार कंपनीने केले. याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.स्थानिक जनतेला आपल्या ग्रामपंचायतींमधूनच उतारे, दाखले आणि अन्य बँंकिंग सुविधा व सेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभर या योजनेचा डंका पिटला गेला. करोडो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला. मात्र, हे आपले सेवा सरकार खरंच जनतेची सेवा करतंय का? याचा शोध घेण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरलीय हे निश्चित. या योजनेची व्याप्ती मोठी असली तरी या माध्यमातून सेवेऐवजी लुटच जास्त होत असल्याचे स्पष्ट होते.आपले सरकार सेवा केंद्र्रातील संगणक परिचारकास मोठी ग्रामपंचायत दरमहा सहा हजार रुपये मानधन तर सहा हजार रुपये स्टेशनरी व इतर खर्चासाठी ग्रामपंचायतीच्या माथी मारले जातात. ही रक्कम जिल्हा परिषद ग्रामपंचायतीकडून चौदाव्या वित्त आयोगाच्या रक्कमेतून जबरदस्तीने वर्ग करून घेते. जर ही रक्कम जिल्हा परिषद घेत असेल तर संबंधित कंपनी शासनाशी झालेल्या करारानुसार सेवा सुविधा ग्रामपंचायतींंना देते का? याचीही जिल्हा परिषदेने चौकशी करायला हवी.राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीमधून कोट्यवधी रुपयांचा ‘मलिदा’ सर्वांच्या साक्षीने हडप केला जात आहे. असे असताना शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते एवढेच काय पण ज्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाते.अशात ग्रामपंचायतींंचे पदाधिकारीदेखील मूग गिळून गप्प का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित कंपनीचे चालक मालक शासनापेक्षाही मोठे आहेत की शासनच ते चालवत आहेत. असाच आरोप यामध्ये होरपळलेल्यासंगणक परिचारक, ग्रामसेवकतसेच सरपंचांकडून होऊ लागला आहे.शासनाकडून दखल घेण्याची गरज‘डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र’ निर्मितीसाठी सर्वच ग्रामपंचायतींना पेपरलेस कामकाज पध्दतीचा अवलंब करावा लागत आहे. हे करण्यासाठी वरिष्ठांकडून संबंधित ग्रामपंचायतींमधील पारिचारिकांवर दबाव टाकला जात आहे.पेपरलेसच्या कामाची जबाबदारी ज्या कंपनीवर देण्यात आली आहे. त्या कंपनीने कोण कोणत्या ग्रामपंचायतीत किती संगणक परिचारक नेमले आहेत? त्याठिकाणी अपेक्षित स्टेशनरी दिली आहे का? या बाबींची शासनाकडून का दखल घेतली जात नाही? हा संशोधनाचा विषय बनला आहे.

परिचारक नेमणूकीचे अधिकार ग्रामपंचायतींना द्याआपले सेवा सरकार केंद्रांचा देखभालीसाठी ग्रामपंचायतींकडून पैसे उकळले जात आहेत. ग्रामपंचायतीच्या पैशावर खासगी कंपनी पोसण्याची गरजच काय? जर या केंद्रांचा कारभार सुरळीत करायचा असेल तर या केंद्राचे नियंत्रण ग्रामपंचायतींंना द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.