शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मंडईची वाटचाल कचरा डेपोकडे

By admin | Updated: December 2, 2014 00:26 IST

महात्मा फुले भाजी मंडई : घाण पसरविणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी

सातारा : येथील जुना मोटार स्टँड भाजी मंडईमध्ये महिन्याभरापासून कालबाह्य झालेले चायनीजचे सॉस डबे आणून टाकत आहेत. यामुळे संपूर्ण भाजी मंडईत दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय याठिकाणी जागोजागी सडलेला भाजीपाला पडला असून, याठिकाणी व्यावसायिकही बसत असल्याने सध्या भाजी मंडईची वाटचाल सोनगाव कचरा डेपोसारखी होऊ लागली आहे. एकीकडे स्वच्छता मोहिमेचा डंका पिटला जात असताना नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या भाजी मंडईच्या स्वच्छतेच्या प्रश्नाकडे मात्र अनेक दिवसांपासून दुर्लक्ष होत आहे. महात्मा फुले भाजी मंडईत संपूर्ण सुविधा असूनदेखील केवळ स्वच्छतेच्या अभावामुळे ही मंडई कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. मागील महिन्यांपासून या भाजी मंडईतील कचराकुंडीत कोणीतरी अज्ञात व्यक्ती पाच लिटरचे चायनीज सॉसचे सुमारे दोनशे-तीनशे कॅन आणून ओतत आहे.हा कालबाह्य झालेल्या सॉसमुळे मंडईत दुर्गंधी पसरत आहे. दरम्यान, मंडईत मोकाट जनावरे व मद्यपींचा अड्डा बनली आहे. सकाळपासून मंडईत मद्यपी अड्ड्यावर पडून असतात, तर मोकाट जनावरांचे पडलेल्या भाजीपाल्यावर ताव मारून परिसरात घाण करतात. यामुळे या मंडईची अवस्था बिकट झाली आहे. (प्रतिनिधी)मद्यपींचा वावरशहरातील सर्वसुविधा असलेल्या या मंडईत सध्या मोकाट जनावरे जनावरे व मद्यपींचाच वावर असतो. यामुळी ही जागा म्हणजे टाकाऊ अन्नपदार्थ फेकण्याची जागा आहे. जुना मोटारस्टँडवरील ही भाजी मंडई सर्वात मोठी आहे. ग्राहकांचाही मोठा कल याच मंडईत आहे. मंडईत सर्व सुविधा असूनदेखील केवळ दुर्लक्षामुळे आज मंडईची दुरवस्था झाली आहे. यामुुळे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.- फारूख बागवान