शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उधळलेल्या भंडाऱ्यात बियाही रंगल्या !

By admin | Updated: March 5, 2017 23:20 IST

‘काऊदरा’वर निसर्गपूजा : निवकणेच्या डोंगरावर पर्यावरणाचा संदेश; शेकडो निसर्गप्रेमींची उपस्थिती

मणदुरे : मानवाकडून निसर्गावर होणारे अतिक्रमण, वाढती जंगलतोड त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. निसर्गावरील आघात रोखण्याचा संदेश देत काऊदरा येथील डोंगरावर बियांची उधळण करत निसर्ग पूजा करण्यात आली. पाटण तालुक्यातील निवकणे येथील जानाई देवीची वार्षिक यात्रा सोमवार, दि. ६ व मंगळवारी आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक येतात. यात्रेनिमित्ताने जेजुरी येथून खंडोबाचा भंडारा घेऊन जानाई देवीच्या यात्रेसाठी पायी पालखी घेऊन निघते. ही पालखी रविवारी सकाळी मणदुरे येथील काऊदऱ्यावर पोहोचली. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील जानाई देवी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. त्यांनी जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा अन् निवकणेच्या जानाई देवीच्या गुलाल आणि बियांची उधळण करत निसर्गाला नारळ अर्पण केला. त्यानंतर निसर्ग पूजा करण्यात आली. मानवाकडून निसर्गावर होणारे अतिक्रमण, जंगलतोड यामुळे वन्यजीवांची साखळी संपुष्टात येत आहे. निसर्गाचे संतुलन राहावे, यासाठी जयाद्री ते सह्याद्री असा प्रवास करत पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी जयाद्री मित्र परिवार, पाटण तालुका पत्रकार संघ, पाटण वनविभागातर्फे ही निसर्ग पूजा साजरी केली.ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण बारभाई, किसन बारभाई, अ‍ॅड. वसंत नाझीरकर, राजेंद्र बारभाई, शिवाजी कुतवळ, रत्नाकर मोरे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनावणे, नगरसेविका रुक्मिणी जगताप, बारभाई, विक्रमबाबा पाटणकर, ज्ञानदेव गावडे, गोरख नारकर, एस. एम. स्वामी होते. (वार्ताहर)तुळशीच्या पाचशे रोपांचे वाटपयावेळी जानाई देवी ट्रस्टतर्फे सह्याद्रीच्या कडेकपारीत राहून निसर्ग जपणाऱ्या सर्व महिलांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. जगदंबा प्रतिष्ठान उरळीकांचन यांच्याकडून तुळशीच्या पाचशे रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच फलटणच्या युवकांनी प्लास्टिक गोळा केले.निसर्ग गाणी अन् झिम्मा फुगडीजेजुरी येथून आलेल्या महिला निसर्ग पूजा झाल्यानंतर स्थानिक महिलांसोबत निसर्गाची गाणी गात झिम्मा फुगडी खेळल्या. यामुळे डोंगरावर यात्रेचे स्वरूप आले होते.