शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘रोटरी क्लब’चा पूरग्रस्तांना हात : राजपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST

सातारा : रोटरी क्लबने सामाजिक बांधीलकी जपत केलेली मदत हे आदर्शवत काम असून, विधायक कामासाठी क्लब नेहमीच अग्रेसर असतो, ...

सातारा : रोटरी क्लबने सामाजिक बांधीलकी जपत केलेली मदत हे आदर्शवत काम असून, विधायक कामासाठी क्लब नेहमीच अग्रेसर असतो, असे मत जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यांच्यावतीने महाबळेश्वर तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. रोटरीच्या अध्यक्षा वैशाली काळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

स्टोव्हसह राशन, गव्हाचा आटा, तेल, मोहरी, हळद, मीठ, प्लेट्स, तसेच चादरी, चटई, एलईडी, महिलांसाठी साड्या, तर लहान मुलांसाठी कपडे, वह्या, पेन, आदी जीवनावश्यक साहित्याचे कीट तयार करून महाबळेश्वर तालुक्यामधील घावरी व मालुसर या गावातील बाधितांना वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पाटण, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावातील लोकांना तांदूळ, तुरडाळ, मिनरल वाटर, मेणबत्ती, बेड्शीट, चटई, टॉवेल, सॅनिटरी पॅड, टूथपेस्ट, साबण, डेटॉल, डीडीटी पावडर, आदी जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून वितरित केलेले आहे. याव्यतिरिक्त मुंबई पोलिसांसाठी रेनकोटस आणि कस्तुरबा हॉस्पिटल परेल येथील अपंगांसाठी व्हीलचेअरचेदेखील वितरण केलेले आहे.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीजचे सेक्रेटरी तारीखभाई, क्लब मेंबर शुभम कदम, राकेश शेटे, अनिकेत पवार, वैभव ठाकर, सुनील जाधव, प्रवीण भिलारे, श्रीधर भाडलकर, कल्पना शिंदे, आदींनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदत केली.

फोटो नेम : ०४डीसीसी

फोटो ओळ : महाबळेश्वर येथे आपत्तीग्रस्तांना रोटरी क्लबतर्फे मदत देण्यात आली.