शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणात ‘रयत’ने घेतलेली भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

सातारा : कोरोनासारख्या विषाणूमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे ...

सातारा : कोरोनासारख्या विषाणूमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी संस्थेतील सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही ही गोष्ट रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षांच्या लौकिकाला साजेशी बाब आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादनाच्या ऑनलाइन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाइस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे इतर सर्व मान्यवर सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाइफ मेंबर, लाइफ वर्कर कार्यकर्ते, रयत सेवक उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापनाच्या बाबतीत केलेल्या कार्याचे कौतुक करून पवार म्हणाले, ‘कोविड-१९’सारख्या विषाणूमुळे जगामध्ये सर्वच क्षेत्रात एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. अशा कालखंडात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल यासारखी साधनांची कमतरता असतानाही ‘रोझ’ प्रकल्प राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श संस्थेने निर्माण केला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने रोज अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून आपण पोहोचवू शकलो ही समाधानाची बाब असल्याचे पवार म्हणाले.

दरम्यान, सकाळी कर्मवीर यांच्या समाधीला संस्थेचे उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, संस्थेचे ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, संस्थेचे कायदा सल्लागार ॲड. दिलावर मुल्ला, संस्थेचे समन्वयक डी. एस. सूर्यवंशी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले. उपस्थितांबद्दलची कृतज्ञता संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी व्यक्त केली.

चौकट :

कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली राष्ट्रीय पुरस्कार देशमुख आणि पोपरे यांना जाहीर

कर्मवीर यांच्या जयंतीच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार आणि रयत माउली लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. २०२० चे पुरस्कार शरद पवार यांनी आज जाहीर केले. यामध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत गणपतराव देशमुख यांना जाहीर करण्यात आला. रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय अशा स्वरूपाचे सामाजिक कार्य करणाऱ्या बीजमाता राहीबाई सोमा पोपरे यांना जाहीर करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.