शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’बाबत अधिकारी फैलावर

By admin | Updated: December 24, 2014 23:38 IST

उपजिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा : मिरज पंचायत समितीमध्ये बैठक

मिरज : मिरज तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांसंबंधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपजिल्हाधिकारी सुचेता भिकाणे यांनी झाडाझडती घेतली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी बजावले. मिरज पंचायत समितीत सुचेता भिकाणे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेतला.यावेळी तहसीलदार किशोर घाडगे, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, सहायक गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्याच्या पूर्व भागातील २९ गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर, नालाबंडींग, गोठा, क्रीडांगण व बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीच्या कामांची त्यांनी माहिती घेतली. जत, आटपाडी हे तालुके रोजगार हमी योजनेची कामे राबविण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना रोजगाराचा लाभ मिळत आहे.मिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विलंबाबाबत विचारणा केली. रोजगार हमी योजनेची कामे ही सामुदायिकपणे राबविण्यासाठी राज्य शासनाच्या विभागप्रमुखांनीही जबाबदारी घेण्याची गरज आहे. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण गटविकास अधिकारी वाघमोडे यांनी सांगितले. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले. योजनेच्या कामांची वेळेत पूर्तता करुन संबंधितांना लाभ देण्यात कुचराई केल्यास गय केली जाणार नसल्याचे सुनावले. यावेळी जि. प. व पंचायत समिती सदस्यांनी सरपंच, ग्रामसेवक सहकार्य करीत नसल्याची तक्रार केली. पदाधिकारी व अधिकाऱ्यांत समन्वय असल्याशिवाय रोजगार हमी योजनेच्या कामांना गती येणार नाही. समन्वयाने काम केल्यास तालुक्यात या योजनेचा इतर तालुक्यांपेक्षा प्रभाव दिसेल, अशी सूचना सभापती दिलीप बुरसे यांनी केली. याची दखल घेऊन भिकाणे यांनी सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे करण्याची सूचना केली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव दत्तक योजना संकल्पनाही भिकाणे यांनी मांडली. जि. प. सदस्य प्रकाश देसाई, शंकर पाटील, बाबासाहेब कांबळे, अरूण राजमाने, सतीश नीळकंठ या पंचायत समिती सदस्यांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)गटविकास अधिकाऱ्यांना जाबमिरज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांच्या प्रस्तावांना १५ दिवसात मंजुरी देण्याची गरज असताना, सहा महिने कामांना मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारीची दखल घेऊन भिकाणे यांनी गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांना विलंबाबाबत विचारणा केली. सध्या या कामांचा भार पंचायत समितीवर पडत असल्याचे कारण वाघमोडे यांनी सांगितले. कामात दिरंगाई करणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले.