शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

डोंगरावरून कोसळताहेत दगडगोटे, त्यातच तरुणांचे फोटोसेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बहुतांश पर्यटक रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटोसेशन करत असतात. या भागात गेल्या काही ...

पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात बहुतांश पर्यटक रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटोसेशन करत असतात. या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे डोंगरातून दगडगोटे, माती पडत आहे. यामुळे अपघातांचा धोका संभवतो. त्यामुळे निष्काळजीपणातून फोटोसेशन करणे जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराच्या पश्चिमेस कास तलाव, बामणोली, भांबवली धबधबा या जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बहुतांश पर्यटक पर्यटनास येत आहेत. त्यांना यवतेश्वर घाटातूनच प्रवास करावा लागत असतो. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून वाहनचालकांची, पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. तसेच शेकडो वाहनांची सतत वर्दळ सुरू आहे. पर्यटनस्थळी भेट देत असताना जाता-येता हमखास पर्यटक यवतेश्वर घाटात थांबत असतात. घाटातील वानरसेनेचे बच्चेकंपनीला असणारे कुतूहल, मनाला शांती देणारा खळखळणारा झरा तसेच एका दृष्टिक्षेपात नयनरम्य दिसणारी सातारानगरी, या सर्व बाबींचे नेहमीच आकर्षण असणारे पर्यटक यवतेश्वर घाटात जाता-येता थांबतच असतात.

दरम्यान, घाटात थांबल्यानंतर बहुतांश पर्यटकांना फोटोसेशनचा मोह आवरत नसल्याने एखादा फोटो तसेच सेल्फीमध्ये एवढे तल्लीन होत आपण कधी रस्त्याच्या मधोमध आलो आहोत, याचे भान राहत नाही. मात्र, पावसाळ्यात कधी दरड, दगडगोटे निसटून रस्त्यावर येतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तरीही थांबणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे पर्यटकांनी यवतेश्वर घाटात फोटोसेशन करताना सावधानता बाळगणे महत्त्वपूर्ण आहे.

कोट

स्टंट करता येईल, अशा अनेकविध ठिकाणी मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा तरुणाईचा कल जास्त आहे. यावेळी फोटोसेशन मोठ्या प्रमाणावर केले जाते. आपले पाल्य असुरक्षित ठिकाणी जाऊन फोटोसेशन करताना कोणताही धोका पत्करणार नाही, यासाठी पालकांनी लक्ष देऊन वेळोवेळी त्यांना सूचना करणे आवश्यक आहे.

- यशोदा पवार,

पालक, सातारा

चौकट

निसरड्या कडा

या परिसरात सतत पाऊस पडत असल्याने कडा निसरड्या झाल्या असून शेवाळ साठले आहे. अतिउत्साही तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून फोटो काढतात. मात्र, शेवाळांवरून पाय घसरल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. याचे भान या परिसरात येणाऱ्यांनी ठेवायला हवे.

फोटो २६यवतेश्वर

यवतेश्वर घाटात वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध तरुणाई फोटोसेशन करून जीव धोक्यात घालत आहे. (छाया : सागर चव्हाण)