शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लूटमारीतील फरारी आरोपीला अटक

By admin | Updated: November 19, 2014 23:23 IST

रेल्वेत चोरी : एकवीस वर्षे गायब

मिरज : मिरज-पंढरपूर देवाच्या गाडीत प्रवाशांच्या लूटमारप्रकरणी दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय ४०) ता. प्रतापनगर, सातारा या फरारी आरोपीस मिरज रेल्वे पोलिसांनी तब्बल २१ वर्षांनी अटक केली. सातारा येथे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दत्तात्रय जाधव यास लूटमारीच्या दोन गुन्ह्यात न्यायालयात हजर न राहता फरारी असल्याने अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले. तीन साथीदारांसोबत दत्तात्रय जाधव याने १९९३ मध्ये मिरज-पंढरपूर देवाच्या गाडीने प्रवास करणाऱ्या बाबू कृष्णा खिंडकर रा बार्शी व विलास वसंत वरयूकर (रा. पट्टणकडोली) यांना गुळवंची ते ढालगावदरम्यान चाकूचा धाक दाखवून मारहाण करून साडेसात हजार रुपये लुटले होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी लूटमारीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यात दत्तात्रय जाधव, मेघराज हेगडे, अर्जुन तायाप्पा हेगडे (रा. प्रतापपूर, जत), अनिल भोसले (वय ३०, रा. सातारा) या चौघांना अटक केली होती. मात्र त्यानंतर दत्तात्रय जाधव न्यायालयात हजर न राहता गुंगारा देत होता. न्यायालयाने जाधव यास अटक करून हजर करण्याचे आदेश दिल्याने रेल्वे पोलीस जाधव यास ताब्यात घेण्यासाठी आठ ते दहावेळा सातारा येथे गेले होते. मात्र प्रत्येकवेळी जाधव प्रतापनगर झोपडपट्टीतून पसार झाला. जाधव याच्या समर्थकांनी व महिलांनी पोलिसांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याने जाधव यास पकडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते. (वार्ताहर)संशयिताला कोठडीसातारा येथे एका दरोडाप्रकरणी जाधव यास सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर रेल्वे पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांच्या पथकाने जाधव यास ताब्यात घेऊन सांगली न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने जाधव यास १४ दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.