शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमधील रस्ते दर्जेदार होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 04:04 IST

फलटण : ‘फलटण शहरातील ज्या भागातील भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागातील रस्त्यांची कामे सुरु करण्यात ...

फलटण : ‘फलटण शहरातील ज्या भागातील भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, त्या भागातील रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहेत. शहरातील सर्व रस्ते लवकरच दर्जेदार होतील,’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

फलटण शहरातील पिरॅमिड चौक ते पद्मावती नगर या रस्त्याचे भूमिपूजन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, ज्येष्ठ नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पाणी पुरवठा सभापती मधुबाला भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संजीवराजे म्हणाले, महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात शहरात पाणी पुरवठा योजना पाचवा टप्पा, भूमिगत वीज वाहिन्या, जलतरण तलाव, नगर परिषद प्रशासकीय कार्यालय इमारत, विविध भागात व्यापार संकुले, रिंग रोड, आदी कोट्यवधींची कामे झाली. तसेच सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिथे भुयारी गटारचे काम पूर्ण होईूल, त्या भागातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत असून, आगामी काळात शहरातील सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील.

फलटण शहरामध्ये विविध विकासकामे सुरु असून, आगामी काही वर्षांत फलटण शहर एक मॉडेल सिटी होईल, असा विश्वास यावेळी पाणी पुरवठा सभापती अ‍ॅड. मधुबाला भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेविका प्रगती कापसे, वैशाली चोरमले, सुवर्णा खानविलकर, ज्योत्स्ना शिरतोडे, तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, राहुल निंबाळकर, तुषार नाईक-निंबाळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो : ११ फलटण

फलटण येथे संजीवराजे नाईक-निंबाळकर, मधुबाला भोसले, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, संजय गायकवाड, अजय माळवे, रणजितसिंह भोसले यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. (छाया : नसीर शिकलगार)