शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे रुंदीकरण झाडांच्या मुळावर!

By admin | Updated: July 9, 2015 22:53 IST

वनविभाग-प्रशासनाची डोळेझाक : वाईच्या पश्चिम भागात बेसुमार वृक्षतोड

पांडुरंग भिलारे - वाई -वाईच्या पश्चिम भागात मुगावजवळ अंतर्गत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे़ या रुंदीकरणात बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे़ ही वृक्षतोड करीत असताना कोणत्याही विभागाची परवानगी घेतली गेलेली नाही़ , यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे़ शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रूपये खर्च करीत असताना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांच्या मुळावरच घाव घातला जात असून प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी, या मागणीचे स्थानिक ग्रामस्थांनी प्रातांना निवेदन दिले आहे़निवेदनात म्हटले आहे की, या रस्ता रुंदीकरणात आंबा, फणस, नारळ यासारखी फळझाडे जमीन दोस्त करण्यात आली आहेत़ या व्यतिरिक्त शाळेचे पटांगण, पाण्याची टाकी, मंदिर, गोबर गॅस, वैयक्तिक शौचालय संरक्षक भिंत तोडण्याच्या मार्गावर असून यामुळे स्थानिक नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे़ प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे़ या निवेदनावर परिसरातील लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ लहान वस्तीसाठी ३५ फुटी रस्ता?रस्ता रुंदीकरण वैयक्तिक स्वार्थापोटी करण्यात येत आहे़ वास्तविक हा दळणवळणाचा मुख्य रस्ता नसून दहा ते वीस घरांची वस्ती असलेला परिसर आहे़ त्यामुळे एवढ्या छोट्या वस्तीसाठी पस्तीस फुटी रस्त्याची काय आवश्यकता, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे़. परवानगी न घेता वृक्षतोडया रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या आठ दिवसांपासून चालू असून याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रकाची परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले़ संबंधित विभागाने या बेसुमार वृक्षतोडीची त्वरित पाहणी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे़