शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीत अडकला ‘प्रतापगड’चा रस्ता

By admin | Updated: January 4, 2017 22:23 IST

पर्यटकांची वाट बिकट : रस्त्याची अवस्थाही दयनीय; तीन-चार किलोमीटर पर्यंत लागतायत वाहनांच्या रांगा

महाबळेश्वर : मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देत उभा असलेला प्रतापगड किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. महाबळेश्वरात दाखल होणारे हजारो पर्यटक दररोज प्रतापगडावर हजेरी लावतात. मात्र, या किल्ल्याकडे जाणारी वाट बिकट झाली असून, पर्यटकांचा याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर किल्ल्याच्या पायथ्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागत असून, वाहतूक कोंडीने अनेकांची दमछाक उडत आहे.महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची नेहमीच रेलचेल सुरू असते. शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड किल्लाही पर्यटकांना नेहमीच आकर्षिक करीत असतो. यामुळे महाबळेश्वरला भेट देणारे हजारो पर्यटक प्रतापगड किल्ला पाहिल्याशिवाय परतीच्या प्रवासाचा निघत नाहीत.पर्यटकांचा हंगाम असो अथवा नसो प्रतापगडावर मात्र पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागता आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पुरेशी जागा नसल्याने अनेक वाहनधारक रस्त्याकडेला वाहने पार्क करीत आहेत. परिणामी ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांची दमछाक होतेय शिवाय वेळही वाया जातो. वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली असून, पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)...तर पायवाटेने प्रवासवाहतूक कोंडी झाल्यानंतर पर्यटकांना वाहतूक पूर्ववत होईपर्यंत तासन्तास वाट पाहत बसावे लागत आहे. त्यामुळे अनेक पर्यटक जिथे जागा मिळेल तिथे गाडी पार्क करून प्रतापगडाकडे चालतच कूच करीत आहेत. गडाकडे जाण्यासाठी जंगलातून एक पायवाट आहे. या वाटेद्वारेही पर्यटक गडावर येत आहे. केवळ वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना अनेक समस्या उद्भवत असून, याबाबत प्रशासनाने तत्काळ उपाययोजना आखणे गरजेचे आहे. अन्यथा याचा पर्यटनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.रस्त्याकडेला दगडांचे ढीग...वाडा-कुंभरोशी ते प्रतापगड या चार किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सर्वत्र खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. मात्र, एक वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू आहे. संरक्षक कठडे बांधण्यासाठी लागणाऱ्या दगडी रस्त्याकडेला टाकण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या दगडी रस्त्याकडेला ‘जैसे थे’ असून, वाहतुकीस याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.