शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीने अडविला कृष्णामाईचा मार्ग

By admin | Updated: February 25, 2016 01:14 IST

वाईतील चित्र : नदीपात्रात गटाराचे पाणी अन् कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांमधून स्वच्छतेची मागणी

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून, संथ वाहणारी कृष्णामाई आता अनेक समस्यांनी थांबते काय? याची भीती व दु:ख नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील दूषित पाण्यामुळे तिला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. यावर्षीचे अत्यंत कमी पर्जन्यमान, वाढते उष्णतापमान तिरावरील अनेक गावे व शहर यांची पिण्याची व शेतीसाठी वाढती मागणी यामुळे कृष्णा नदीच्या वाहणाऱ्या पाण्याची पातळी फारच कमी झाली आहे. वाई शहरातून वाहताना तिच्या पात्रात शहरातील दूषित पाणी मिसळत आहे. तर पाण्याचा प्रवाह वाहत नसल्याने नदीपात्रात अनेक ठिकाणी वारंवार निर्माण होणाऱ्या जल वनस्पती मानवनिर्मित कचरा यामुळे तिला ‘गटार गंगेचे’ स्वरूप आले आहे. पुरातन काळात कृष्णा नदीचे वैभव मोठे होते. अनेक गीतांमधून तिचा उल्लेख संथ वाहते कृष्णामाई असा व्हायचा. परंतु धोम धरण झाल्यानंतर उन्हाळ्यात तिच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत कमी वाहतो. जागोजागी जलचर वनस्पती मानवनिर्मित कचरा यामुळे तिचे पाणी दूषित झाले आहे. कृष्णा नदीपात्रात काही ठिकाणी बांध घालून बंधारे निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असून, पाणी साठा कायमच राहून त्यामुळे पाण्याचा प्रवाह चालू राहील. तसेच शहरातील दूषित पाणी याचे नियोजन करून पात्रातील पाणी स्वच्छ राहील याची काळजी प्रशासन आणि जनतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महाबळेश्वरात उगम पावलेल्या कृष्णा नदीचा उल्लेख पुरातन काळापासून केला जातो. या नदीला इतर कमडलू, कुडाळी कोयना, वेण्णा अशा अनेक नद्या येऊन मिळाल्या. परंतु समुद्राला मिळेपर्यंत कृष्णेचे नाव मात्र कायम राहिले आहे. तिच्या तिरावर अनेक धार्मिक व पर्यटनस्थळे वसली आहेत. तिच्या यात्रा व उत्सव अनेक ठिकाणी साजरा केला जातो. (प्रतिनिधी)