शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याला म्हणे कोरोना झालाय... लागलीच लॉकडाऊन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेंद्रे : माणसांना कोरोना होतोय, पण एखाद्या रस्त्याला कोरोना झाल्याचे आपण कधी ऐकले नसेल. पण सोनगाव-खिंडवाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शेंद्रे : माणसांना कोरोना होतोय, पण एखाद्या रस्त्याला कोरोना झाल्याचे आपण कधी ऐकले नसेल. पण सोनगाव-खिंडवाडी रस्त्याची कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच मिळत नसल्याने संबंधित गावच्या नागरिकांना रस्त्यालाच कोरोना झाला की काय असे वाटत आहे. या आशयाचा फलक लावून त्याला लॉकडाऊन करा, या आशयाचा फलक लावला. तो सर्वांचे लक्ष वेधत आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्यातील सोनगाव-खिंडवाडी रस्त्याची गेली एक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खडी पूर्णपणे उखडल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली असून बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभाग व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. सोनगाव ग्रामपंचायतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोनगाव-खिंडवाडी हा कोरोनाग्रस्त रस्ता सोनगाव हद्दीत असला तरी या रस्त्याच्या उपचाराची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे की जिल्हा परिषदेची आहे, यावर संशोधन सुरू आहे. रस्त्याच्या गंभीर आजाराची जाणीव मतदार संघातील सर्वच नेत्यांना आहे. परंतु हा कोरोनाग्रस्त रस्ता केवळ सोनगाव हद्दीत असल्यामुळे होणारे बदनामीचे संक्रमण थांबवण्यासाठी हा रस्ता शासनाने लॉकडाऊन ठेवावा ही ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे असे जाहीर निवेदनाचा फ्लेक्स बोर्ड या मार्गावर लावण्यात आला आहे.

या फ्लेक्स बोर्डमुळे संपूर्ण परिसरात याची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावरच राष्ट्रीय महामार्गालगत तीव्र स्वरूपाचा उतार आहे. त्यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात ग्रामपंचायत मार्फत पाठपुरावा करूनही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यक्षेत्रात येतो याबद्दल प्रशासनामध्ये दुमत आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली गेली नाही. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी या रस्त्यावर उपरोधिक फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. आता तरी प्रशासन जागे होणार की नाही, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

पर्यावरणाची हानी

टाळण्यास मदत

सोनगाव-खिंडवाडी रस्त्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सोनगाव ग्रामपंचायतीतर्फे मार्गावर हा उपहासात्मक फ्लेक्स बोर्ड लावला आहे. आता तरी अपघातांची संख्या विचारात घेता प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा ग्रामपंचायत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करणार आहे, असा इशारा सरपंच पांडुरंग नावडकर यांनी दिला आहे.

फोटो ११सोनगाव-रोड

सोनगाव-खिंडवाडी रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर निवेदनाचा फ्लेक्स लावण्यात आला आहे.