शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील खड्डे विहिरींपेक्षाही खोल!

By admin | Updated: October 18, 2015 23:33 IST

येरळेतील कृष्णविवरे : बेसुमार वाळू उपशाचे नदीत डोंगर; अवैध वाळूउपसा रोखण्याचा अंबवडेतील युवकांचा निर्धार--आॅन दि स्पॉट...

शेखर जाधव/रशीद शेख --वडूज/औंधअंबवडे, ता. खटाव येथील येरळा नदीपात्रात बेकायदा वाळू उपशाने विहिरींपेक्षाही खोल खड्डे पडले आहेत. वाळूमाफियांनी पाडलेल्या या खड्ड्यांनी शनिवारी तीन चिमुकल्यांचा बळी घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला केला आहे. नदीपात्रात उभे असलेले वाळूचे भलेमोठे ढिगारे पाहिल्यानंतर खड्ड्यांची खोली किती असेल, याचा पुरावा मिळू शकतो.अंबवडे-गोरेगाव पूल ते येरळवाडी धरण अशा चार किलोमीटरच्या नदीपात्राची अक्षरश: चाळण झाली आहे. प्रमाणापेक्षा मोठे खड्डे काढून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. २५ ते ३० फुटांचे खड्डे नदीपात्रात तयार झाले आहेत. येरळवाडी धरणाच्या भराव्यापर्यंत वाळूउपसा सुरू आहे. धरणाच्या आजूबाजूला सुरू असलेला वाळूउपसा असाच सुरू राहिला तर भविष्यात धरणाला भगदाड पडून अंबवडेसह परिसरातील गावांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. तरीही या प्रकाराकडे प्रशासनाची डोळेझाक का? प्रशासन चिमुकल्यांचा जीव जाण्याची वाट पहात होते का, असा संतप्त सवाल अंबवडे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.या परिसरातील विहिरींना पूर्वी जेवढे पाणी असायचे, तेवढे सध्या दिसत नाही. नदीकाठी विहीर खणली तर विहिरीला पाणी लागेल, या आशेवर शेतकरी होते; परंतु नदीपात्रात वाळू उपशाने पडलेल्या खड्ड्यांची खोली विहिरींपेक्षाही खोल असल्यामुळे विहिरींना पाणी लागत नाही. अशी स्थिती आहे. वाळू वाहतुकीची वाहनांमुळे शेतीचेही नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला असता ठेकेदारांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चोरटी वाहतूक वाळू वाहतूक करण्यांपुढे अनेकदा नमते घ्यावे लागते. परंतु यापुढे आता अंबवडे हद्दीत बेकायदा वाळू उपसा होऊ न देण्याचा निर्धार युवकांनी केला आहे.मुदत संपूनही वाळू उपसा सुरूचखड्ड्यात पडून तीन मुलांचा मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी शासकीय वाहनाची तोडफोड केली. हा संताप स्वाभाविकच होता. कारण संबंधित वाळू ठेक्याबाबत ठराव न देण्याचा ग्रामपंचायतीने ठराव करूनही लिलाव जाहीर झाला. ठेकेदाराने वाळू उपशाची मुदत संपूनही वाळूउपसा सुरू ठेवला होता. प्रशासनानेही याकडे डोळेझाक केली, असा आरोप अंबवडे ग्रामस्थांनी केला आहे.महसूल विभागाचा वरदहस्त?नदीपात्रात काही ठिकाणी वाळू लिलाव झाले आहेत. तर काही भागात महसूल विभागाच्या वरदहस्ताने खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. वाळूमाफिया व प्रशासन यांची मिलीभगत असल्याने अशा दुर्घटना होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.वाकेश्वरातही खड्ड्यांनी घेतलेला जीवयापूर्वी वाकेश्वर, ता. खटाव परिसरातील नदीपात्रात वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात एकाला जीव गमवावा लागला होता. मात्र तरीही प्रशासनाचा वाळूमाफियांवर वचक राहिलेला नव्हता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अंबवडेत शनिवारी पुन्हा खड्ड्यांनी तीन चिमुरड्यंचा जीव घेतला. दिवसभर रानात कष्ट करून रात्री अंग जमिनीला टेकावे म्हटले तर रात्रभर अवैध वाळू वाहतुकीची वाहने सुसाट धावत असतात. वाहनांच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. यापुढे अशी अवैध वाळू वाहतूक आम्ही रोखू.- सोमनाथ पवार, ग्रामस्थ, अंबवडेबेकायदा व अवैध वाळू वाहतुकीने अंबवडे-गोरेगाव रस्ता तसेच परिसरातील रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही यापुढे सर्व गावातील युवक अवैध वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालणार आहोत.- वैभव पवार, अंबवडेउत्तर-दक्षिण वाहिनी वळली पश्चिमेकडे!येरळा नदी ही उत्तर-दक्षिण वाहणारी; परंतु प्रचंड अवैध वाळू उपशामुळे नदीचा मार्ग पश्चिमेकडे वळला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी खचू लागल्या आहेत. विहिरी वर आणि नदीपात्र खाली असे चित्र पाहायला मिळत आहे.वाळूमाफियांची दादागिरीयेरळा नदीचे पात्र मुजोर वाळूमाफियांनी ठिकठिकाणी कुरतडले असून शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मज्जाव केल्यास त्याला दमदाटी व शिवीगाळ केली जात आहे.