शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाचवडमध्ये घुमला ‘ईट राईट इंडिया’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:32 IST

पाचवड : देशातील काश्मीर, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, तिरुअनंतपुरम, रांची व गोवा या सहा ठिकाणांहून स्वस्थ भारत यात्रा निघाली आहे. ...

पाचवड : देशातील काश्मीर, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, तिरुअनंतपुरम, रांची व गोवा या सहा ठिकाणांहून स्वस्थ भारत यात्रा निघाली आहे. तिरुअनंतपुरम येथून निघालेली ही यात्रा मंगळवार, दि. ४ रोजी पाचवड येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज याठिकाणी आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यायातील विद्यार्थ्यांनी ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत पौष्टिक आहार घेण्याची शपथ घेतली.यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे, अन्न सुरक्षा प्राधिकरण मुंबईचे सहायक आयुक्त व्ही. के. पंचम, जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनावणे व मुख्याध्यापक भागवत कणसे उपस्थित होते.विद्यार्थी-विद्यार्थिनी व युवा पिढीने शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी काय खावे व काय खाऊ नये, याबाबतची सविस्तर माहिती सांगण्यात आली. आपल्या दैनंदिन आहारामधील साखर, मीठ व तेलाचे प्रमाण योग्य ठेवल्यास त्याचा शरीरावर कशाप्रकारे चांगला परिणाम होतो तसेच मानवी जीवनामधील आहाराचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी पौष्टिक आहार घेण्याची प्रतिज्ञा घेतली.महात्मा गांधीजींनी सुदृढ भारतची हाक दिली होती. त्या अनुषंगाने या यात्रेचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेले आहे. सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास करणारी ही यात्रा खंडाळा या ठिकाणी कार्यक्रम घेत पुढे २६ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे पोहोचणार आहे.असाही सहभाग...किसनवीर महाविद्यालय, वाईचे एनसीसी विभागातील प्रशिक्षक लेफ्टनंट समीर पवार यांच्यासह विद्यार्थी स्वस्थ भारत यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. हे सर्वजण सायकल चालवून ही यात्रा करणार आहेत. त्यामुळे देशातील जनतेला ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत स्वस्थ राहण्याची प्रेरणा देण्यात किसनवीर महाविद्यालयाचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.